सुसुस्कृंत शहर अशी ओळक असलेल्या तसेच विद्येचे माहेर घर म्हणून प्रसिध्द असणाऱ्या पुणे शहरात गुन्ह्यांचे प्रमाण वाढत आहे. या गुन्ह्यांमध्ये प्रामुख्याने बाल गुन्हेगारीचे प्रमाण अधिक असल्याचे जाणवत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे बाल गुन्हेगारांकडून होत असलेल्या गंभीर गुन्हयांसंबंधाने आवश्यक उपाययोजना करणे आवश्यक असल्याने अभिलेखावरील बाल गुन्हेगारांचे व त्यांच्या पालकांचा समुपदेशन करण्यासाठी पोलीस उपआयुक्त परिमंडळ ४ आणि ५ने पुढाकार घेत मेळाव्याचे आयोजिन करण्यात आले होते. या मेळाव्यात बाल गुन्हेगार आणि त्यांच्या पालकांशा संवाद साधण्यात येवून त्यांचे समुपदेशन करण्यात आले.
शहरात अलीकडे घडणारे गंभीर गुन्ह्याचा आढावा पोलिसांकडून घेण्यात आला. त्यात बाल गुन्हेगारांकडून वारंवार गंभीर स्वरुपाचे गुन्हे घडत आहेत. त्यात बहुतांश गंभीर गुन्हयांमध्ये बाल गुन्हेगारांचा सहभाग असल्याचे निदर्शनांस आले आहे. परिमंडळ ४ मधील पोलीस स्टेशन विधी संघर्षग्रस्त बालक व त्यांचे पालक अशा एकूण १८० जणांशी संवाद साधण्यात आला. तर परिमंडळ ५च्या कार्यक्षेत्रातील वानवडी व हडपसर विभागातील वेगवेगळया पोलीस ठाण्याकडील एकूण ६८ बाल गुन्हेगार व ७६ पालक यांना मेळाव्यांमध्ये सहभागी करुन घेण्यात आले. बाल गुन्हेगारांना तसेच १० वी व १२ वी शिक्षण घेत असलेले बाल गुन्हेगारांना त्यांच्या पुढील उज्वल भवितव्यांचे दृष्टीने शिक्षण किती महत्त्वाचे आहे, याबाबत माहिती व संदेश देवून त्यांना पुढे गुन्हे न करणेबाबत आवाहन करण्यात आले.
पोलीस आयुक्तांच्या आदेशाने मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. पूर्व प्रादेशिक विभागाचे अप्पर पोलीस आयुक्त रितेश कुमार, परिमंडळ ०५ चे पोलीस उप आयुक्त रंजनकुमार शर्मा, परिमंडळ ४ चे पोलीस उपआयुक्त शशिकांत बोराटे यांच्या मार्गदर्शनाखाली मेळावा पार पडला.
या बाबत केले मार्गदर्शन..
- उपस्थित बालक व त्यांच्या पालकांना कायदे विषयक माहिती देऊन शिक्षणांचे महत्व समजावुन सांगितले.
- पालकांनी बालकांविषयी आपली जबाबदारी ओळखुन त्यांच्यावर लक्ष ठेवण्याच्या सूचना दिल्या.
- सध्या सोशल मीडियाचा गैरवापर व त्याचे माध्यमातुन समाजामध्ये वाढत्या बाल गुन्हेगारी बाबत माहिती दिली.
- अंमली पदार्थांचे सेवन त्यातुन वाढणारी व्यसनाधीनता पर्यायाने वाढणारी गुन्हेगारी याबाबत माहिती देण्यात आली.
- बालकांचा पौष्टिक आहार कसा असला पाहिजे, व्यायामाचे काय महत्व आहे ? याबाबत माहिती दिली.
- वाहतुकीचे नियम, गुड टच, बॅड टच या विषयावर सूचना देऊन मार्गदर्शन केले.
- बालकांच्या अंगी असलेल्या कलागुणांना वाव देऊन त्यांना गुन्हेगारी क्षेत्रापासून परावृत्त कसे करता येईल याबाबत मार्गदर्शन करणेत आले.
- बालकांच्या अडचणी जाणून घेतल्या तसेच पोलीस हेल्पलाइन व बालक हेल्पलाइन नंबर ११२, १०९१, १०९८ बाबत माहिती दिली.