मांजरी परिसर हादरला... अल्पवयीन मुलीवर बलात्कार
पुणे : घरकामावरून आई रागावल्यामुळे चिडून घरामधून बाहेर पडलेल्या मुलीला पुन्हा घरी सोडण्याच्या बहाण्याने दोन तरुणांनी दुचाकीवर बसवून एका पडक्या खोलीत नेऊन तिच्यावर बलात्कार केला. खळबळ उडवून देणारी (pune crime news) ही घटना हडपसर येथील मांजरी बुद्रुकमधील सटवाई नगर मध्ये घडली. हडपसर पोलिसांनी याप्रकरणी बलात्काराचा (Rape) गुन्हा दाखल केला असून दोघा जणांना अटक करण्यात आली आहे.
अभिषेक गणेश जगताप (Abhishek Ganesh Jagtap) (वय २०, रा. मांजरी बुद्रुक) आणि निलेश नामदेव यादव (वय २०, रा. मांजरी बुद्रुक) अशी अटक आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी १४ वर्षीय पीडित मुलीने तक्रार दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी ही शाळेमध्ये नववीत शिकते. तिची आई कामावरून तिला रागवत होती. त्यामुळे ती घरामधून टॉयलेटला जाऊन येते असे सांगून बाहेर पडली. चालत चालत घरापासून लांब आली. त्यावेळी अभिषेक जगताप याने या मुलीला हिंदी मधून 'तुम कहा जा रही हो? मेरा नाम अभिषेक है... मै तुम्हे घर तक छोडता हु' असे म्हणत तिची समजूत काढली.
त्यानंतर त्याने निलेश यादव याला फोन करून बोलावून घेतले. थोड्या वेळातच निलेश हा बुलेट घेऊन त्या ठिकाणी आला. या दोघांनी तिला गाडीवर बसवून जवळच्या एका पडक्या खोलीमध्ये नेले. त्या ठिकाणी तिच्यावर जबरदस्ती करीत तिच्यासोबत अश्लील कृत्य करायला सुरुवात केली. तिने विरोध केला असता ठार मारण्याची धमकी देऊन तिच्यावर बलात्कार करण्यात आला. त्यानंतर हे आरोपी तिथून पसार गेले. या मुलीने घरी आल्यानंतर कुटुंबीयांना या घडलेल्या प्रकाराची माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. आरोपींचा शोध घेऊन त्यांना अटक करण्यात आली.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.