Pune Crime : घरफोडी ! भरदिवसा बंद फ्लॉट फोडून अडीच लाखांचा ऐवज लंपास

एनडीए रस्त्यावरील वारजे येथील स्वर बिल्डींग तपोधन येथील एक बंद फ्लॉट फोडून भरदिवसा चोरट्यांनी २ लाख ४० हजार रुपयांचा ऐवज लंपास केल्याचा प्रकार समोर आला आहे.

Pune Crime

घरफोडी ! भरदिवसा बंद फ्लॉट फोडून अडीच लाखांचा ऐवज लंपास

पुणे: एनडीए रस्त्यावरील वारजे येथील स्वर बिल्डींग तपोधन येथील एक बंद फ्लॉट फोडून भरदिवसा चोरट्यांनी २ लाख ४० हजार रुपयांचा ऐवज लंपास केल्याचा प्रकार समोर आला आहे. (Pune Crime News) 

 याप्रकरणी वारजे येथील एका ६० वर्षीय व्यक्तीने वारजे माळवाडी पोलिस (Malvadi Police) ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्यांच्या विरुद्ध घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना २३ डिसेंबर रोजी सकाळी अकरा ते दुपारी पावने तीन वाजताच्या सुमारास घडली आहे. ऐवजामध्ये पंधरा हजार रुपये आणि सोन्याच्या दागिण्यांचा त्यामध्ये समावेश आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा फ्लॉट बंद असताना चोरट्यांनी भरदिवसा बनावट चावीने किंवा इतर कोणत्यातरी साधनाने उघडून आत प्रवेश केला. त्यानंतर बेडरुमधील लोखंडी कपाटातील लॉकरमध्ये ठेवलेली १५ हजार रुपयांची रोकड आणि सोन्याचे दागिणे असा एकूण २ लाख ४० हजार रुपयांचा ऐवज लंपास केला. फिर्यादी जेव्हा घरी परतले तेव्हा त्यांना घरात चोरी झाल्याचे समजले. त्यानुसार त्यांनी पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली. अधिक तपास  पोलिस उपनिरीक्षक नरेंद्र मुंडे करीत आहेत.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest