Crime News : खडकी, कोरेगाव पार्क परिसरात घरफोडी; तब्बल १५ तोळे सोन्याचे दागिने लंपास

शहरातील खडकी आणि कोरेगाव परिसरात घरफोडीच्या घटना घडल्या. या दोन घटनांमध्ये चोरट्यांनी तब्बल १५ तोळे सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम असा एकूण तेरा लाख ८४ हजार रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला.

Crime News : खडकी, कोरेगाव पार्क परिसरात घरफोडी; तब्बल १५ तोळे सोन्याचे दागिने लंपास

संग्रहित छायाचित्र

पुणे शहरातील खडकी आणि कोरेगाव परिसरात घरफोडीच्या घटना घडल्या. या दोन घटनांमध्ये चोरट्यांनी तब्बल १५ तोळे सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम असा एकूण तेरा लाख ८४ हजार रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला.

याप्रकरणी खडकी आणि कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात अनोळखी चोरट्यां विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बोपोडी येथील भाऊ पाटील रोडवरील शिबा सोसायटीच्या दुसऱ्या मजल्यावरील घराचा बंद दरवाजाचे  तोडून कुलूप तोडून घरात प्रवेश केला. बेडरुममधील लोखंडी कपाटातील १५ तोळे सोन्याचे दागिने, रोख रक्कम असा एकूण १३ लाख १० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरट्यांनी चोरुन नेला. शनिवारी सकाळी घरी आल्यानंतर चोरीचा प्रकार उघकीस आला. याबाबत प्रविण शामलाल तायल (वय-४३ ) यांनी खडकी पोलीस ठाण्यात  फिर्याद दिली आहे. फिर्य़ादी तायल हे शुक्रवारी (दि.22) रात्री नऊच्या सुमारास घराला कुलूप लावून बाहेर गेले होते. चोरट्यांनी घराच्या टेरेसच्या दरवाजाचे  पुढील तपास पोलीस करीत आहेत.

दुसऱ्या घटनेत कोरेगाव पार्क येथील सुकोथाई स्पा सेंटरच्या  ग्राऊंड फ्लोअरचा लोखंडी दरवाजा बंद असताना चोरट्याने बाजुला असलेली खिडकी व प्लायवूड तोडून आत प्रवेश केला. स्पा सेंटर मधील रिसेप्शन येथे ठेवलेली ७४ हजार रुपयांची रोख रक्कम व मोबाईल चोरट्याने चोरुन लंपास केला. हा प्रकार रविवारी (ता.२५) दुपारी दीड ते पावणे दोन दरम्यान घडला आहे. याबाबत दिबोरा झिलींग (वय-३२ रा. कोरेगाव पार्क) यांनी कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात फिर्य़ाद दिली आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest