पिंपरी-चिंववड : लोखंडी रॉडने झालेल्या मारहाणीत एकजण गंभीर जखमी

लोखंडी रॉडने झालेल्या मारहाणीत एकजण गंभीर जखमी झाला. ही घटना रविवारी (२१ एप्रिल) सायंकाळी साडेचार वाजता मावळ तालुक्यातील उर्से येथे घडली. गोपीनाथ बाळासाहेब लिमण (वय ४८, रा. सांगवडे, ता. मावळ) असे जखमी व्यक्तीचे नाव आहे.

Pimpri Chinchwad Crime

संग्रहित छायाचित्र

मावळ : लोखंडी रॉडने झालेल्या मारहाणीत एकजण गंभीर जखमी झाला. ही घटना रविवारी (२१ एप्रिल) सायंकाळी साडेचार वाजता मावळ तालुक्यातील उर्से येथे घडली. गोपीनाथ बाळासाहेब लिमण (वय ४८, रा. सांगवडे, ता. मावळ) असे जखमी व्यक्तीचे नाव आहे. या प्रकरणी अनिकेत गोपीनाथ लिमण (वय २०) यांनी शिरगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार ३१ वर्षीय महिलेच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Pimpri Chinchwad Crime)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे वडील गोपीनाथ हे उर्से येथे खोल्यांची देखभाल करत असताना त्यांनी एका महिलेचा दरवाजा वाजवल्याच्या कारणावरून त्यांचा वाद झाला. त्या कारणावरून आरोपी महिलेने गोपीनाथ यांना लोखंडी रॉडने डोक्यात, हातावर मारून त्यांना गंभीर जखमी केले. शिरगाव पोलीस तपास करीत आहेत.

 

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest