Police Bribe : दहा हजारांची लाच घेताना सहायक फौजदार गजाआड

शिरूर पोलीस (Shirur Police) ठाण्यात दोन वर्षांपूर्वी दाखल असलेल्या गुन्ह्यात अटक न करण्यासाठी ५० हजारांच्या लाचेची मागणी करून तडजोडीअंती दहा हजार रुपयांची लाच स्वीकारताना सहायक पोलीस फौजदाराला रंगेहात पकडण्यात आले.

Police Bribe

दहा हजारांची लाच घेताना सहायक फौजदार गजाआड

पुणे : शिरूर पोलीस (Shirur Police) ठाण्यात दोन वर्षांपूर्वी दाखल असलेल्या गुन्ह्यात अटक न करण्यासाठी ५० हजारांच्या लाचेची मागणी करून तडजोडीअंती दहा हजार रुपयांची लाच स्वीकारताना सहायक पोलीस फौजदाराला रंगेहात पकडण्यात आले. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) शिरूर तहसीलदार (Shirur Tahshil) कचेरीसमोर असलेल्या हॉटेल मित्रधनमध्ये ही कारवाई करण्यात आली.

राजेंद्र दगडू गवारे (Rajendra Gaware) (वय ५३) असे अटक करण्यात आलेल्या सहायक फौजदाराचे नाव आहे. याप्रकरणी ६५ वर्षीय तक्रारदाराने एसीबीकडे तक्रार दिली आहे. तक्रारदार व त्यांच्या मुलाविरुद्ध शिरूर पोलीस ठाण्यामध्ये दोन वर्षांपूर्वी दखलपात्र गुन्हा दाखल झालेला होता. या गुन्ह्यामध्ये तक्रारदार आणि त्यांच्या मुलाला अटक न करण्यासाठी तसेच  गुन्ह्यात मदत करण्यासाठी गवारे याने ५० हजारांची लाच मागितली. याबाबत एसीबीकडे तक्रार करण्यात आली.

या तक्रारीचे अनुषंगाने मंगळवारी पडताळणी करण्यात आली. गवारे याने तडजोड़ीअंती दहा हजार रुपयांची लाच मागितली.  ही लाच पंचासमक्ष स्वीकारताना गवारे याला रंगेहाथ पकडले. ही कारवाई पोलीस निरीक्षक प्रणेता सांगोलकर, पोलीस शिपाई प्रवीण तावरे, आशिष डावकर, चालक पोलीस हवालदार काकडे यांनी केली.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest