भांडणे सोडविणे आले अंगलट... तरुणावर प्राणघातक हल्ला
पुणे : भांडणे सोडायला गेलेल्या तरुणावर प्राणघातक हल्ला करण्यात आला. त्याच्या डोक्याला पिस्तूल (pistol) लावून दोन वेळा मागेपुढे करून ठार मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. ही घटना मुंढवा येथील केशवनगर मध्ये घडली. (Pune Crime News)
सिद्धार्थ शावळकर (Siddharth Shawalkar) (वय २०, रा. केशवनगर), सुमित गौड (वय २२, रा. वडगावशेरी), राहुल आवारे (Rahul Aware) (वय २१, रा. वडगाव शेरी) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. यातील राहुल आणि सिद्धार्थ या दोघांना अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी कौशल लक्ष्मण पायगन (Kaushal Laxman Paygan) (वय २१, रा. केशवनगर) यांनी फिर्याद दिली आहे. कौशल त्याच्या मित्राला भेटायला ओम साई मित्र मंडळ जवळच्या, गोदरेज सोसायटीच्या गेट शेजारी गेलेले होते. त्यावेळी त्यांच्या तोंड ओळखीचा मुलगा प्रवीण सिंग याला आरोपी मारहाण करीत होते. कौशल हे त्यांची भांडणे सोडवण्यासाठी गेले. त्यावेळी राहुल याने त्यांची गचंडी पकडून आवळला आणि त्यांना ढकलून दिले. सिद्धार्थ याने त्यांना खाली पाडून मारहाण केली आणि सुमित गौड यांनी त्याच्या कमरेल लावलेले पिस्तूल काढून उलट्या बाजूने त्यांच्या डोक्यात मारले. त्यांना गंभीर जखमी करून लाथा बुक्क्यांनी मारहाण करण्यात आली. पिस्तूल त्यांच्यावर रोखून धरत दोनदा पुढे मागे करून ठार मारण्याची धमकी दिली. या प्रकारामुळे आसपासचे लोक घाबरून पळून गेल्याचे फिर्यादीमध्ये नमूद करण्यात आले आहे.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.