शाळकरी मुलाला पळविण्याचा प्रयत्न विश्रांतवाडी परिसरात खळबळ
पुणे : (Pune News) शाळा सुटल्यानंतर घरी जात असलेल्या बारा वर्षांच्या लहान मुलाला पळवून नेण्याचा प्रयत्न करण्यात आला. हा मुलगा तिथून कसाबसा पळून गेल्यामुळे अनर्थ टळला. ही घटना आळंदी रस्त्यावरील रश्मी इंग्लिश मीडियम स्कूल (Rashmi English Medium School) जवळ असलेल्या पादचारी भुयारी मार्गाजवळ घडली. या प्रकरणी विश्रांतवाडी पोलीस (Vishrantwadi Police) ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी ३६ वर्षीय व्यक्तीने फिर्याद दिली आहे. फिर्यादी यांचा बारा वर्षांचा अल्पवयीन मुलगा जवळच्या शाळेमध्ये शिकायला आहे. शाळा सुटल्यानंतर तो घरी चालत जात होता. त्यावेळी शाळेजवळच असलेल्या भुयारी मार्गाजवळ एक माणूस बुरखा घालून उभा असल्याचे त्याला दिसले. या व्यक्तीने त्या लहान मुलाला जबरदस्तीने पकडून पळवून नेण्याचा प्रयत्न केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.