पुणे : मसाज पार्लरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय; कोरेगाव पार्क पोलिसांकडून कारवाई

मसाज पार्लरच्या (Massage Parlour) नावाखाली वेश्या व्यवसाय (Prostitute business) सुरू असल्याचा प्रकार समोर आला असून कोरेगाव पार्क पोलिसांनी याप्रकरणी कारवाई करीत तींन तरुणींची सुटका केली.

Koregaon Park massage parlour

पुणे : मसाज पार्लरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय कोरेगाव पार्क पोलिसांकडून कारवाई

पुणे : मसाज पार्लरच्या (Massage Parlour) नावाखाली वेश्या व्यवसाय (Prostitute business) सुरू असल्याचा प्रकार समोर आला असून कोरेगाव पार्क पोलिसांनी याप्रकरणी कारवाई करीत तींन तरुणींची सुटका केली. याप्रकरणी मसाज पार्लर चालक महिलांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोरेगाव पार्कमधील लेन नंबर ७ मधील हरमेश विशाल बिल्डींगमधील विवा स्पामध्ये ही कारवाई करण्यात आली. 

श्वेता उर्फ शिल्पा प्रकाश पगार (वय ३०, रा. कवडेवाडी, कोरेगाव पार्क), वैशाली मेहता (रा. वाघोली) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या महिलांची नावे आहेत. याप्रकरणी पोलीस हवालदार सपना जाधव यांनी कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. विवा स्पा मसाज पार्लरमध्ये वेश्याव्यवसाय सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अश्विनी सातपुते यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने छापा टाकला. पोलिसांनी मसाज पार्लरमधून तिघईनची सुटका केली आहे. यामध्ये नागालॅंड, पश्चिम बंगालमधील दोन तरुणींचा समावेश आहे. मसाज पार्लर चालक पगार आणि मेहता यांनी पैशांचे आमिष दाखवून त्यांना वेश्याव्यवसायास प्रवृत्त केल्याचे फिर्यादीमध्ये नमूद करण्यात आले आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest