Accident: शिवनेरी बसने दिली धडक, वृद्धेचा मृत्यू

पुणे : भरधाव शिवनेरी बसची धडक बसल्यामुळे झालेल्या अपघातात ७५ वर्षीय महिलेचा अपघाती मृत्यू झाला. ही घटना स्वारगेट येथील केशवराव जेधे चौकामध्ये गुरुवारी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास घडली.

Accident News

संग्रहित छायाचित्र

स्वारगेट येथील केशवराव जेधे चौकामध्ये घडली घटना

पुणे : भरधाव शिवनेरी बसची धडक बसल्यामुळे झालेल्या अपघातात ७५ वर्षीय महिलेचा अपघाती मृत्यू झाला. ही घटना स्वारगेट येथील केशवराव जेधे चौकामध्ये गुरुवारी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास घडली. (Accident News)

कस्तुरीबाई रतनलाल राठोड (वय ७५, रा. व्हीआयपी कॉलेज समोर, अप्पर इंदिरानगर, बिबवेवाडी) असे मृत्युमुखी पडलेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी शिवनेरी बस चालक करण प्रकाश बहादुर (वय ३२, रा. गार्निश बिल्डिंग, आंबेगाव पठार) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोनाली रवींद्र पुजारी (वय ३०) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुजारी यांची आजी कस्तुरीबाई राठोड या स्वारगेट येथील जेथे चौकातून रस्त्यावरून चालत जात होत्या. त्यावेळी बहादूर हा चालवीत असलेल्या शिवनेरी बसची त्यांना जोरात धडक बसली. या अपघातामध्ये ठाकूर यांच्या हाताला पायाला आणि डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यांना तात्काळ रुग्णालयात हलवण्यात आले. परंतु, त्यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest