पिंपरी-चिंचवड : धक्कादायक! प्रेमसंबंध असल्याच्या संशयावरून तरुणाचा खून

प्रेमसंबंधाच्या संशयातून तरुणाला लाथाबुक्क्यांनी मारहाण करत चौघांनी मिळून एका तरुणाचा खून केला आहे. ही घटना रविवारी (२१ एप्रिल) चिंचवड येथे घडली. सुरेश लोडबा ढेंबरे (वय-२१, रा. चिंचवड) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे.

Pimpri Chinchwad Murder

संग्रहित छायाचित्र

चिंचवड : प्रेमसंबंधाच्या संशयातून तरुणाला लाथाबुक्क्यांनी मारहाण करत चौघांनी मिळून एका तरुणाचा खून केला आहे. ही घटना रविवारी (२१ एप्रिल) चिंचवड येथे घडली. सुरेश लोडबा ढेंबरे (वय-२१, रा. चिंचवड) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. (pimpri chinchwad crime) 

पिंपरी पोलीस ठाण्यात ३५ वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे. त्यानुसार संतोष चौघुले (वय २५, रा. चिंचवड), दोन महिला आणि संतोष याचा एक मित्र यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संतोष याला पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत सुरेश ठोंबरे फिर्यादी यांचा दीर आहे. त्याचे आरोपी महिलेच्या मुलीसोबत प्रेमसंबंध असल्याचा आरोपींना संशय होता. त्या कारणावरून आरोपींनी सुरेश याला लाथाबुक्क्यांनी व कमरेच्या बेल्टने बेदम मारहाण केली. त्यात सुरेश गंभीर जखमी झाल्याने त्यातच त्याचा मृत्यू झाला. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत. (Pimpri Chinchwad Murder)

 

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest