संग्रहित छायाचित्र
सांगवी : रस्ता दुभाजकाला कार धडकून तरुणाचा मृत्यू झाला. ही घटना पिंपळे निलख येथे २१ फेब्रुवारी रोजी घडली. स्वप्नील पुष्कराज जोशी याचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी महिलेने सांगवी पोलीस (Sangvi Police) ठाण्यात फिर्याद दिली आहे. (Accident News)
यावरून साहिल संजय चौधरी याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व त्यांचे मित्र स्वप्नील जोशी, साहिल चौधरी हे जेवणासाठी पाषाणला गेले होते. जेवून ते कारमधून सांगवीला येत होते. यावेळी साहिल गाडी चालवत होता. त्याचा कारवरून ताबा सुटला व कार थेट रस्ता दुभाजकावर आदळली.यात गाडीचे नुकसान झाले. या अपघातात स्वप्नील जोशीचा मृत्यू झाला आहे. तर फिर्यादी या किरकोळ जखमी झाल्या आहेत. सांगवी पोलीस तपास करीत आहेत.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.