Pune Crime News : जातीवाचक शिवीगाळ करीत महिलेसह मुलीला मारहाण

किरकोळ वादामधून महिलेला जातीवाचक शिवीगाळ (Caste abuse) करीत एका महिलेची आणि तिच्या मुलीचा विनयभंग (molestation) करून बॅटने आणि रॉडने मारहाण करण्यात आल्याची घटना खडकीमध्ये घडली.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Laxman More
  • Wed, 8 Nov 2023
  • 01:09 pm
Pune Crime News

संग्रहित छायाचित्र

पुणे : किरकोळ वादामधून महिलेला जातीवाचक शिवीगाळ (Caste abuse) करीत एका महिलेची आणि तिच्या मुलीचा विनयभंग (molestation) करून बॅटने आणि रॉडने मारहाण करण्यात आल्याची घटना खडकीमध्ये घडली. याप्रकरणी खडकी पोलिसांनी (Khadaki Police) आरोपीविरोधात विनयभंग आणि ॲट्रॉसिटी कायद्यानुसार (Atrocities Act) गुन्हा दाखल केला आहे. (Pune Crime)

सतीश के भास्करराव कुसुमुरू (वय ४८) आणि विजया (दोघेही रा. रेंजहिल्स, खडकी) अशी आरोपींची नावे आहेत. या प्रकरणी ४५ वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे. फिर्यादी आणि आरोपी हे एम्युनेशन फॅक्टरीच्या कॉर्टर्समध्ये एकाच इमारतीत राहण्यास आहेत. फिर्यादी पहिल्या मजल्यावर राहतात. फिर्यादी यांच्या रूममधून खालच्या रूममध्ये टॉयलेट आणि बाथरूम मध्ये पाणी लिकेज होते. त्यामुळे आरोपी आणि त्यांच्यामध्ये वारंवार वाद होतात.

दोन दिवसांपूर्वी याच वादातून आरोपी त्यांच्या घरी गेले. त्यांच्या घरावर लाथा मारून दार उघडायला भाग पाडले. दार उघडले नाही म्हणून आरोपींनी रस्त्यावर जाऊन 'ये महार मातंग... इनकी औकात या रहने की नही है... उनको मै यहा से खाली करवा के ही रहूंगा' असे म्हणत शिवीगाळ केली. फिर्यादी महिलेने त्याचा जाब विचारला असता, आरोपीने त्यांच्या डोक्यात रॉड मारून जखमी केले आणि त्यांना अश्लील स्पर्श करीत विनयभंग केला.  त्यांच्या मुलीला रूममध्ये ओढून तिचा देखील विनयभंग करण्यात आला आणि पाठीमध्ये तसे डाव्या हातावर बॅटने गंभीर मारहाण करण्यात आली, असे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस आयुक्त बनसोडे करीत आहेत.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest