Accident : चार चाकीला धडकून दुचाकी चालकाचा मृत्यू

बाजीराव रस्त्यावरील राणा प्रताप उद्यानासमोरुन भरधाव वेगाने जाणारी दुचाकी चार चाकीला आदळ्याने अपघात झाला. या अपघातात दुचाकी चालकाचा मृत्यू झाला. ही घटना रविवारी रात्री दोन वाजता घडली.

Accident

पुणे: बाजीराव रस्त्यावरील राणा प्रताप उद्यानासमोरुन भरधाव वेगाने जाणारी दुचाकी चार चाकीला आदळ्याने अपघात झाला. या अपघातात  दुचाकी चालकाचा मृत्यू झाला. ही घटना रविवारी रात्री दोन वाजता घडली. या अपघातात दुचाकीवरील सहप्रवासी तरुण जखमी झाला. (Pune Accident News) 

गुंजन दत्तात्रय सोनवणे (वय २५, रा. कोथरुड) असे मृत्युमुखी पडलेल्या तरुणाचे नाव आहे. अपघातात दुचाकीवरील सहप्रवासी तरुण शुभम गवांदे जखमी झाला आहे. याबाबत दिलीप पुरोहित (वय २१, रा. निगडीप्राधिकरण ) याने खडक पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चारचाकी चालक पुरोहित मध्यरात्री दोन वाजता बाजीराव रस्त्याने निघाला होता. त्यावेळी दुचाकीचालक गुंडन आणि त्याचा मित्र शुभम वाहतुकीचे नियमांकडे दुर्लक्ष करुन भरधाव वेगाने निघाले होते. राणा प्रताप उद्यानासमोर भरधाव वेगात असलेल्या दुचाकीने चार चाकीच्या उजव्या बाजूला जोराची धडक दिली. या अपघातात दुचाकी चालक गुंजन आणि त्याचा मित्र गंभीर जखमी झाले. अपघातानंतर त्या दोघांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारांपूर्वीच गुंजनचा मृत्यू झाला होता. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक विनय जाधव करत आहेत.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest