मुंबई पोलिसांच्या नावाने घातला गंडा
पुणे : फेडेक्स मुंबई अंधेरी ब्रांच (Mumbai Police) मधून बोलत असल्याची बतावणी करून फिर्यादीच्या नावाने आलेल्या पार्सल मध्ये १४० ग्रॅम मेफेड्रोन सापडले असल्याचे सांगत त्यांच्याकडून तीन लाख पाच हजार २०० रुपये ट्रान्सफर करून घेत ऑनलाईन (Pune News) फसवणूक करण्यात आली. हा प्रकार ४ सप्टेंबर रोजी घडला होता. याप्रकरणी चंदननगर पोलिसांनी (Chandannagar Police) गुन्हा दाखल केला आहे.
विक्रम अनिल माणके (वय ३२, रा. थिटे वस्ती, खराडी) यांनी फिर्याद दिली आहे. हा माणके यांना अज्ञात आरोपीने फोन केला. तो फेडेक्स मुंबई अंधेरी ब्रांच मधून बोलत असल्याची बतावणी केली. त्याच्या डीपीवर मुंबई पोलिसांचा लोगो होता.
मुंबई ते तैवान असे तुमच्या नावाने पाठवलेले पार्सल आले असून ते अडकले आहे असे त्यांनी सांगितले. त्यामध्ये १४० ग्रॅम एमडीएम सापडले असून त्यामध्ये मनी लॉन्ड्रीगसाठी तुमचे आधार कार्ड वापरले गेल्याची बतावणी केली. त्यांना अटकेची आणि कारवाईची भीती घालून दंड स्वरूपात आयसीआयसीआय बँकेच्या खात्यावर रक्कम ट्रान्सफर करायला लावून आर्थिक फसवणूक केली. याप्रकरणी सायबर पोलिसांकडे तक्रार अर्ज देण्यात आला होता. त्यावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.