आरपीएफ जवानासह एनजीओच्या कर्मचाऱ्याकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार
पुणे : प्रियकरासोबत छत्तीसगडवरून पुण्यात (Pune Crime News) आलेल्या १७ वर्षीय अल्पवयीन मुलीवर (Molested) रेल्वे प्रोटेक्शन फोर्सच्या जवानासह दोघीजनांनी बलात्कार केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. या मुलीच्या प्रियकाराकडून पैसे उकळून त्याला पळवून लावत (Pune Police) या मुलीला डांबून ठेवत तिच्यासोबत वारंवार बलात्कार करण्यात आल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी लोहमार्ग पोलिसानी गुन्हा दाखल केला आहे. हा सर्व प्रकार १२ सप्टेंबर ते १७ सप्टेंबर या कालावधीत सिध्दार्थ मल्टिपर्पज सोसायटी संस्थेच्या कार्यालयात घडला.
आरपीएफ जवान अनिल पवार (Anil Pawar) आणि सिध्दार्थ मल्टिपर्पज सोसायटी संस्थेचा कर्मचारी कमलेश तिवारी अशी आरोपींची नावे आहेत. त्यांच्याविरूध्द भादवि कलम ३४२, ४५०, ३८४, ३७६, ३७६ (२) (एन) ५०६, ३४ सी पोक्सो कलम ४, ६, ८, अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी १७ वर्षीय पीडित मुलीने तक्रार दिली आहे. ही पीडित मुलगी दहावीत शिकत असून ती छत्तीसगड राज्यातील बेमेतारा जिल्ह्यात कुटुंबासह राहते. ललिलीधर ठाकूर नावाचा तिचा मित्र आहे. त्याने तिला भेटून 'माझे तुझ्यावर खूप प्रेम असून आपण लग्न करू' असे तिला सांगितले होते. ही मुलगी ०४ सप्टेंबर २०२३ रोजी आजीच्या घरी गेली असताना लीला ठाकुर तेथे आला. घरात कोणीही नसल्याचे पाहुन तिला पुण्याला जाऊ आणि लग्न करू असे म्हणत सोबत घेऊन निघाला. तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढून ९ सप्टेंबर रोजी ते पुण्याकडे निघाले. १२ सप्टेंबर रोजी ते पुणे रेल्वे स्थानकावर पोचले. त्यावेळी तीन व्यक्ती त्यांच्याजवळ आल्या. तेथून त्यांना पोलिसांकडे नेले. तेथे पोलीस गणवेशात अनिल पवार हा कर्मचारी होता. त्याच्यासह अन्य पोलीस देखील होते. कारपीएफ पोलीस कर्मचारी अनिल पवार याने पीडित मुलगी व लिलीधर यांना बराच वेळ बसवून ठेवले.
त्या नंतर रेल्वे कॉलनीतील एका खोलीत पीडित मुलीला व लीलाधर ठाकुर यास बंद करून टाकले. काही वेळानंतर अनिल पवार नागरी वेषात या मुलीकडे आला. तिच्याकडून घराचा नंबर घेऊन तिचे आई वडीलाशी बोलणे करून दिले. तिच्याकडे व लीलाधरकडे पैशांची मागणी केली. त्यानंतर साधारणपणे एकच्या सुमारास या दोघांना वेगवेगळया खोलीत बंद करण्यात आले. दीडच्या सुमारास पवार याने या मुलीवर त्या खोलीमध्ये जबरदस्तीचलने बलात्कार केला. त्यानंतर त्याच खोलीत लीलाधर याला आणुन बंद केले. तिने लीलाधरला आपल्यावर बलात्कार झाल्याचे सांगितले. दुसऱ्या दिवशी दि. १३ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास सिध्दार्थ मल्टिपर्पज सोसायटीचा कर्मचारी कमलेश तिवारी याने या मुलीला काम करण्याच्या बाहण्याने दुसऱ्या खोलीत नेले. तिची छेडछाड करून लैंगिक चाळे करायला सुरुवात केली. पीडित मुलीने विरोध केला त्याने जिवे ठार मारण्याची धमकी देवुन जबरदस्ती शारिरीक संबंध प्रस्थापित केले.
त्यानंतर तिला लीलाधरकडे नेण्यात आले. त्यांच्याकडून सहा हजार रुपयांची मागणी केली. लीलाधर यांनी मित्रा कडुन ऑनलाईन घेतलेले पैसे कमलेश व पवार यांनी संगितलेल्या खात्यावर ट्रान्सफर केले. पवार याने लीलाधरला सोडुन दिले. त्यानंतर या मुलीला पुन्हा खोलीत डांबून ठेवले. पवार व तिवारी जेव्हा जेव्हा संधी मिळेल तेव्हा तेव्हा तिच्यावर बलात्कार करीत होते. हा सर्व प्रकार रेल्वे कॉलनी येथील सिध्दार्थ मल्टिपर्पज सोसायटीच्या ताडीवाला रोड येथील ऑफिसमध्ये घडला. दरम्यान, छत्तीसगड पोलिसांना घेऊन तिचे वडील पुण्यात आले. मुलीची कशीबशी सुटका करून तिला परत घेऊन गेले. तिने छत्तीसगड पोलिसांना आपल्यावर घडलेल्या अत्याचाराची माहिती दिली. त्यानंतर पोलिसानी या मुलीला महिला व बाल कल्याण समिती आणि न्यायाधीश यांच्यासमोर उभे करण्यात आले. त्यांच्यासमोर या मुलीने आपल्यावर झालेल्या अत्याचारांचा पाढाच वाचला. त्यानंतर या प्रकरणाला वाचा फुटली. पीडित मुलीच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.