Pune Crime: पीएमपीएलमध्ये गर्दीचा फायदा घेत पळवली ४० हजाराची सोन्याची बांगडी

पुणे : पुणे शहरात पीएमपीएल (PMPML) बसमध्ये चोरट्यांनी चांगलाच धुमाकूळ घालता आहे. शहरातील अनेक भागातून बसमध्ये प्रवास करताना गर्दीचा फायदा घेत चोरटे आपला हात साफ करत आहेत. दरम्यान अशीच एक घटना काल दिनांक 28 (गुरुवार) रोजी स्वारगेट ते जांभुळवाडी या मार्गावरील पद्मावती ते के के मार्केट चौकादरम्यान घडली आहे. एका ७२ वर्षीय महिलेच्या हातातील सोन्याची बांगडी चोरट्यांनी पळवली आहे. (Pune Crime)

Pune Crime News

संग्रहित छायाचित्र

आरोपीस सहकारनगर पोलीसांनी ठोकल्या बेड्या

पुणे : पुणे शहरात पीएमपीएल (PMPML) बसमध्ये चोरट्यांनी चांगलाच धुमाकूळ घालता आहे. शहरातील अनेक भागातून बसमध्ये प्रवास करताना गर्दीचा फायदा घेत चोरटे आपला हात साफ करत आहेत. दरम्यान अशीच एक घटना काल दिनांक 28 (गुरुवार) रोजी स्वारगेट ते जांभुळवाडी या मार्गावरील पद्मावती ते के के मार्केट चौकादरम्यान घडली आहे. एका ७२ वर्षीय महिलेच्या हातातील सोन्याची बांगडी चोरट्यांनी पळवली आहे. (Pune Crime)

याप्रकरणी ७२ वर्षीय महिला (रा.आंबेगाव-खुर्द, जांभुळवाडी,पुणे) यांनी सहकारनगर पोलीस ठाण्यात (Pune Police) तक्रार दाखल केली. चांदबाबु अलीहुसेन शेख (वय ३०, रा. बेचाळीस चौक,कोंढवा खुर्द, पुणे) यास पोलीसांनी ताब्यात घेतले असून गु्न्हा दाखल केला आहे. 

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला ह्या २८ डिसेंबर रोजी स्वारगेट ते जांभुळवाडी या मार्गावरून पद्ममावती बस स्थानक ते के. के. मार्केट चौक असा प्रवास करत होत्या दरम्यान आरोपीने बसमधील गर्दीचा फायदा घेत फिर्यादी यांच्या हाताली ४० हजार रुपये किमतीची सोन्याची बांगडी लोखंडी कटरच्या सहाय्याने कापत फिर्यादी महिलेला धक्का देऊन पळवळी. सुदैवाने महिलेला कोणतीही दुखापत झाली नाही.  दरम्यान फिर्यादी महिलेने व बसमधील नागरीकांनी आरोपी चांदबाबु याचा पाठलाग करत त्यास पोलीसांच्या ताब्यात दिले. पुढील तपास सहकारनगर पोलीस करत आहेत. 

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest