Crime News: जिममधून बाहेर पडलेल्या तरुणीचा विनयभंग

पुणे : जिम मध्ये वर्कआउट करून रिक्षा स्टॅन्ड कडे चालत जात असलेल्या तरुणीचा पाठलाग करून तिचा विनयभंग करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. या याप्रकरणी अलंकार पोलीस ठाण्यात

अलंकार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

पुणे : जिम मध्ये वर्कआउट करून रिक्षा स्टॅन्ड कडे चालत जात असलेल्या तरुणीचा पाठलाग करून तिचा विनयभंग करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. या याप्रकरणी अलंकार पोलीस ठाण्यात (Alankar Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Pune Crime News)

नितीन गजानन शेकापुरे (वय ४९, रा.एनडीए रोड, शिंदे नगर, बावधन) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी १८ वर्षीय तरुणीने फिर्याद दिली आहे. ही तरुणी कर्वेनगर येथील सिटी प्राईड मॉल जवळ असलेल्या एका जिम मध्ये व्यायामासाठी गेली होती. जिम मधून वर्कआउट करून ती बाहेर पडली. रिक्षा स्टॅन्डकडे चालत जात असताना आरोपीने तिचा पाठलाग केला. तिच्याजवळ येऊन तिचा विनयभंग होईल आणि तिच्या मनाला लज्जा उत्पन्न होईल अशा वाईट नजरेने तिच्याकडे पाहून अंगाला हात लावण्याचा प्रयत्न केला, असे फिर्यादीमध्ये नमूद करण्यात आले आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest