Pune Crime : महिलेचा विनयभंग केल्या प्रकरणी गुन्हा

घराचे काम सुरू असलेल्या बांधकाम साइटवर पाणी मारण्यासाठी गेलेल्या महिलेला पाहून घराच्या समोरील सोसायटीच्या एका घराच्या बाल्कनीत येऊन पूर्णपणे विवस्त्र होऊन महिलेचा विनयभंग (molestation) केल्याचा प्रकार घडला.

Pune Crime

पुणे: घराचे काम सुरू असलेल्या बांधकाम साइटवर पाणी मारण्यासाठी गेलेल्या महिलेला पाहून घराच्या समोरील सोसायटीच्या एका घराच्या बाल्कनीत येऊन पूर्णपणे विवस्त्र होऊन महिलेचा विनयभंग (molestation) केल्याचा प्रकार घडला. (Pune Crime News) 

या प्रकरणी श्रीधर गणपत उकीर्डे (वय ३५, रा. मु. पो. कान्हुर मेसाई, उकीर्डे वस्ती, ता. शिरूर, जि. पुणे) याच्यावर विनयभंग केल्याप्रकरणी विमानतळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. याबाबत एका २८ वर्षीय महिलेनी फिर्याद दिली आहे. हा प्रकार 23 डिसेंबर रोजी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास घडला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने एका घराच्या बाल्कनीत येवून महिलेच्या मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले. तसेच आरोपीने महिलेकडे पाहून अश्लील हावभाव केल्याचेही फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. पोलीस हवालदार भोसले अधिक तपास करीत आहेत.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest