एसएफआय-अभाविप राड्या प्रकरणी गुन्हे दाखल, एकूण १२ आरोपींमध्ये ३ तरुणींचा समावेश
पुणे : अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (ABVP) आणि स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडिया या (Pune Crime News) विद्यार्थी संघटनांच्या कार्यकर्त्यांमध्ये (SPPU) बुधवारी दुपारी झालेल्या राड्याप्रकरणी चतु:श्रुंगी पोलीस ठाण्यात ( Chatushrungi police station) दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. अभाविप आणि एसएफआय या संघटनांकडून (Pune University) परस्परविरोधी तक्रारी दाखल करण्यात (Pune News) आल्या आहेत. त्यानुसार एकूण बारा जणांविरोधात मारहाण करणे, धमकावणे आणि दंगल सदृश परिस्थिती निर्माण करणे या कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दाखल करण्यात आले आहेत. यामध्ये तीन मुलींचाही समावेश आहे.
अभावीपच्यावतीने महादेव संगप्पा रंगा (वय २३, रा. मंगल भवन, सदाशिव पेठ) यांनी फिर्याद दिली आहे. त्यावरून एसएफआयचे अध्यक्ष सोमनाथ गोविंद निर्मळ, अक्षय गोविंद निर्मळ, अभिषेक मारुती शिंदे, गणेश बाळू जानकर, अस्मिता धावरे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तर स्टुडन्ट फेडरेशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष सोमनाथ गोविंद निर्मळ (वय ३२) यांच्या फिर्यादीवरून अभाविपच्या सात कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये महादेव संगप्पा रंगा, आनंद सुखदेव फुसनर, हर्षवर्धन हरपुडे, अनिल ठोंबरे, अंकिता पवार, श्रेया संजय चंदन आणि सिद्धेश नागेश्वर लाड अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.. हा सर्व प्रकार पुणे विद्यापीठातील जुन्या अनिकेत कॅन्टीन जवळ घडला होता. पुढील तपास उपनिरीक्षक गाडेकर करीत आहेत.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.