Pune Crime : खंडणी मागणाऱ्या तोतया पत्रकारावर गुन्हा दाखल

तुमच्या ऑफिसमध्ये जुगार आणि पत्त्यांचा क्लब चालतो. मला महिन्याला पाच हजार रुपये हप्ता देयला सुरवात करा. अन्यथा तुमच्या बाबतची बातमी पेपरमध्ये छापून तुमची बदनामी करतो. असे सांगून खंडणीची मागणाऱ्या तोतया पत्रकारावर (Fake journalist) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Pune Crime

खंडणी मागणाऱ्या तोतया पत्रकारावर गुन्हा दाखल

पुणे: तुमच्या ऑफिसमध्ये जुगार आणि पत्त्यांचा क्लब चालतो. मला महिन्याला पाच हजार रुपये हप्ता देयला सुरवात करा. अन्यथा तुमच्या बाबतची बातमी पेपरमध्ये छापून तुमची बदनामी करतो. असे सांगून खंडणीची मागणाऱ्या तोतया पत्रकारावर (Fake journalist) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Pune Crime News) 

सुरज एम. पाटोळे (रा. रामटेकडी, हडपसर) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या तोतया पत्रकाराचे नाव आहे. याबाबत राजेश जनार्दन श्रीगिरी (वय ५५) यांनी लष्कर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार १२ डिसेंबर ते २४ डिसेंबर दरम्यान वेस्ट स्ट्रीट कॅम्प येथे घडला.   

श्रीगिरी यांचे कॅम्प परिसरात हॉटेलचा व्यवसाय आहे. श्रीगिरी यांच्या ऑफिसमध्ये येवून तोतया पत्रकार पाटोळे यांने तुमच्या ऑफिसमध्ये जुगार आणि पत्त्यांचा क्लब चालतो. असे सांगत दमदाटी करत मला दर महिन्याला ५ हजार रुपये हप्ता सुरु करण्याची मागणी केली. मात्र त्यावेळी मालक नसल्याचे तेथील कामगाराने आरोपी पाटोळे याला सांगितले मात्र त्यानंतर पाटोळे हा पोलीस नियंत्रण कक्षाला फोन करुन येथे अवैध धंदे सुरु असल्याची खोटी तक्रार करत होता. तक्रार प्राप्त झाल्यानंत गस्तीवरील पोलीस संबंधित ठिकाणी जात असत. मात्र तेथे कोणत्याही स्वरुपाचा असा धंदा सुरु असल्याचे दिसून येत नव्हते. वारंवार तक्रार येत असल्याने श्रीगिरी यांनी पोलीसांना ऑफिसची पाहणी करण्यास सांगून असा कोणताही प्रकार होत नसल्याची खातरजमा केली. असे झाल्यानंतर एक दिवस पाटोळे स्वत: ऑफिसमध्ये आला. त्यानं पुन्हा अवैध सुरु असल्याचे सांगितले. या भागातील असे व्यावसायिक मला महिन्याला पाच हजार रुपये हप्ता देतात. आपणही मला हप्ता देण्यात यावा, अशी मागणी त्याने श्रीगिरी यांच्याकडे केली. तसेच हप्ता दिला नाही तर पेपरमध्ये तुमची बातमी देवून बदनामी करेल, अशी धमकी दिली. त्यामुळे श्रीगिरी यांनी लष्कर पोलीस ठाण्यात धाव घेतली. अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक गायकवाड करीत आहेत.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest