Pune Crime : पुण्यात जेष्ठाच्या विकृतीचा कळस; नराधमाने केला सात वर्षीय मुलीचा विनयभंग

एका साठ वर्षीय वृध्दाने सात आणि आठ वर्षाच्या मुलींचा विनयभंग (molestation)केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. त्याने विकृतीचा कळस गाठला असून असे कृत्य तिसऱ्यांदा केले असल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे.

molestation

पुण्यात जेष्ठाच्या विकृतीचा कळस; राधमाने केला सात वर्षीय मुलीचा विनयभंग

पुणे: एका साठ वर्षीय वृध्दाने सात आणि आठ वर्षाच्या मुलींचा विनयभंग (molestation)केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. त्याने विकृतीचा कळस गाठला असून असे कृत्य तिसऱ्यांदा केले असल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. (Pune Crime News)

या प्रकरणी मोरेश्वर काणे (वय ६०, रा, कर्वेनगर) याच्या विरोधात वारजे पोलीस (Warje Police) ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला पोलीसांनी अटक केली आहे. याबाबत कर्वेनगर येथील एका ३९ वर्षीय तरुणाने फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कर्वेनगर येथील एका मोकळ्या अंगणात दोन मुली खेळत होत्या. त्यांच्यावर त्याने लक्ष ठेवले. त्यांच्यासोबत ओळख केली आणि मिठीत घेवून अशोभनीय वर्तन केले. त्यानंतर त्या ठिकाणी उभ्या असलेल्या रिक्षामध्ये त्या दोघी खेळण्यासाठी गेल्या. पुन्हा आरोपीने त्यांचा पाठलाग करत रिक्षामध्ये शिरुन पुन्हा विनयभंग केला. आरोपी काणेची विकृती लक्षात येताच मुलींना त्यांच्या घरच्यांना माहिती दिली. त्यानंतर कुटुंबाने वारजे पोलीस ठाण्यात धाव घेतली. त्या दोन मुलींचे आई वडिल नोकरी करतात. पहिली, दुसरीच्या वर्गात त्या शिक्षण घेतात. त्या नेहमी प्रमाणे घरासमोरील अंगणात खेळत होत्या. त्यांच्यावर आरोपी काणे याने लक्ष ठेवून विकृतीचा कळस गाठला.

 आरोपी काणे हा कर्वे नगर येथील चांगल्या भागात त्याच्या कुटुंबासह राहतो. त्याची पत्नी गृहिणी आहे, तर मुलाला मोठ्या पगाराची नोकरी आहे. आरोपी काणे हा कोणताही कामधंदा करत नाही. तो परिसरात फिरत असतो. तो मुलींकडे संशियत नजरेने पाहत असल्याच्या तक्रारी वारजे पोलीस ठाण्यात आल्या होत्या. या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर त्याच्याकडे चौकशी केली असता, त्याने यापूर्वी असे कृत्य दोन वेळा केले असल्याचे मान्य केले. या प्रकाराबद्दल दोन वेळा वारजे पोलीस ठाण्यात अनेक दिवसापूर्वी गुन्हा दाखल करण्यात आला होता. परंतु जामिन मिळाल्याने सुटला होता. आता पु्न्हा त्याच्यावर पोलीसांनी गुन्हा दाखल करुन अटक केली आहे. त्याच्या विरोधात न्यायालयात पोलीसांनी आरोप दाखल केले आहे, त्यात आरोपीची पार्श्वभूमी नमूद करण्यात आली आहे. न्यायालयाने आरोपी काणे याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. अशी माहिती तपास अधिकारी पोलीस निरीक्षक स्नेहल जाधव यांनी दिली.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest