जागा देण्याच्या बहाण्याने ६० लाखांची फसवणूक
पुणे : जागा विकत देण्याच्या बहाण्याने ६० लाख रुपयांची (Fraud) फसवणूक करण्यात आल्याप्रकरणी चतु:शृंगी पोलीस ठाण्यात (ChatuShringi police station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Pune Crime News) हा सर्व प्रकार सर्वे नंबर १७, बालेवाडी या ठिकाणी घडला.
अनिल तुकाराम मोहिते (रा. माण, ता. मुळशी) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी पराग सुरेंद्र भिरूड (रा. भुसावळ, जि. जळगाव) यांनी फिर्याद दिली आहे. मोहिते यांनी पराग भिरूड यांना जागा विकत देतो असे सांगितले. त्यांचा विश्वास संपादन करून त्यांच्याकडून वेळोवेळी ५० लाख रुपये ऑनलाईन स्वरूपात आणि दहा लाख रुपये रोख स्वरूपात घेतले. परंत, त्यांना कोणतीही जागा न देता आणि पैसे परत न करता फसवणूक करण्यात आली. त्यांनी हे पैसे परत करण्यासाठी दिलेले चेक देखील वटले नाहीत. हा सर्व प्रकार २०१३ पासून २०१५ पर्यंत घडला होता. याप्रकरणी भेरुड यांनी चतु:श्रुंगी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.