संग्रहित छायाचित्र
पुणे : ट्रान्सपोर्ट कंपनीमध्ये (Transport Company) टीम लीडर म्हणून काम करणाऱ्या व्यक्तीने खोट्या नोंदी दाखवत नफ्यामधून तसेच ॲमेझॉन (Amazon) कंपनीकडून प्राप्त झालेल्या रकमेमधून ४८ लाख ६४ हजार ५५० रुपयांचा अपहार केला. याप्रकरणी स्वारगेट पोलीस ठाण्यात (Swargate Police) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार १ मे २०२२ ते मार्च २०२३ या कालावधी दरम्यान ट्रोकोलॉजी प्रायव्हेट लिमिटेड या ट्रान्सपोर्ट कंपनीच्या मुकुंदनगर येथील कार्यालयात घडला.
सुरज परिमल कुंडू (रा. इंदोर, मध्य प्रदेश), निकिता सुरज कुंडू यांनी अशी दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी करण कीर्तीकुमार बोथरा (वय २८, रा. मुकुंदनगर) यांनी फिर्यादी दिली आहे. बोथरा यांची ट्रोकॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेड नावाची ट्रान्सपोर्ट कंपनी आहे. सुरज कुंडू हा या कंपनीचामध्ये काम करीत होता. त्याच्याकडे गुजरात येथील टीम लीडर पदाची जबाबदारी होती. त्याला इंदोर शहरातील ट्रान्सपोर्ट चे काम पाहण्याची अतिरिक्त जबाबदारी देण्यात आलेली होती.
सुरज कुंडू याने ट्रान्सपोर्टच्या व्यवहारात वाहनांची संख्या वाढवून दाखविली. त्याकरिता ऑनलाइन फॉर्म भरून कंपनीच्या झोनल मॅनेजरला पाठवले. त्यानंतर कनिष्का लॉजी या कंपनीला आणि निकिता कुंडू हिच्या मालकीच्या एन विंग्स ट्रान्स लॉजिस्टिक सोल्युशन या कंपनीला नफ्यामधून उकळलेले पैसे पाठविले. तसेच, ॲमेझॉन कंपनीकडून आलेली रोख रक्कम देखील त्याने स्वतःकडे ठेवून आर्थिक फसवणूक केल्याचे फिर्यादीमध्ये नमूद करण्यात आले आहे.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.