Fraud : टेलिग्राम टास्कद्वारे साडेबारा लाखांना गंडा

व्हाट्सअप तसेच इंस्टाग्राम आणि टेलिग्राम द्वारे ऑनलाईन संपर्क साधत पार्ट टाइम टास्क जॉबचे आमिष दाखवीत बारा लाख ४० हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली. हा प्रकार ११ जुलै २०२३ ते १३ जुलै २०२३ या कालावधी दरम्यान ऑनलाईन घडला.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Laxman More
  • Mon, 6 Nov 2023
  • 12:25 pm
Fraud : टेलिग्राम टास्कद्वारे साडेबारा लाखांना गंडा

टेलिग्राम टास्कद्वारे साडेबारा लाखांना गंडा

पुणे : व्हाट्सअप तसेच इंस्टाग्राम आणि टेलिग्राम द्वारे ऑनलाईन संपर्क साधत पार्ट टाइम टास्क जॉबचे आमिष दाखवीत बारा लाख ४० हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली. हा प्रकार ११ जुलै २०२३ ते १३ जुलै २०२३ या कालावधी दरम्यान ऑनलाईन घडला.

याप्रकरणी वसीम अक्रम खान (वय ३३, रा. कोंढवा) यांनी फिर्याद दिली आहे. कोंढवा पोलिसांनी अज्ञात मोबाईल धारक आणि टेलिग्राम अकाऊंट धारकांवर फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. आरोपींनी फिर्यादी वसीम खान यांना व्हाट्सअप, इंस्टाग्राम आणि टेलिग्राम द्वारे संपर्क साधला. त्यांना पार्ट टाइम टास्क जॉब देण्याचे आमिष दाखवले. त्यांना प्रीपेड टास्कमध्ये पैसे गुंतवण्यास प्रवृत्त करण्यात आले.

त्यांच्याकडून ऑनलाइन स्वरूपात वेगवेगळ्या बँका खात्यांवर तब्बल १२ लाख ४० हजार रुपये घेऊन त्यांची आर्थिक फसवणूक करण्यात आली. याप्रकरणी सायबर पोलिसांकडे तक्रार अर्ज दाखल करण्यात आला होता. त्याचा तपास करून शिवाजीनगर पोलिसांनी हा गुन्हा कोंढवा पोलिसांकडे वर्ग केला आहे. पुढील तपास कोंढवा पोलीस करीत आहेत.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest