संग्रहित छायाचित्र
पुणे : ठाणे मेंटल हॉस्पिटल (Thane Mental Hospital) मधील जेवणाचे कंत्राट मिळवून देण्याच्या आमिषाने दहा लाख रुपयांची फसवणूक (Fraud) करण्यात आली. याप्रकरणी येरवडा पोलीस ठाण्यात (Yerwada Police) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा सर्व प्रकार जुलै २०२० ते आज पर्यंत येरवडा मेंटल हॉस्पिटल मध्ये घडला.
राजू एरम अंदाजे, दत्तात्रय कुलकर्णी, यशोदीप कुलकर्णी, भुवनेश कुलकर्णी, जनार्दन चांदणे अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी आकाश बाळासाहेब तुपेरे (वय ४०, रा. संभाजीनगर, धनकवडी) यांनी फिर्याद दिली आहे. आरोपींनी आपापसात संगणक करून तुपेरे आणि त्यांचे मित्र विनायक सणस यांचा विश्वास संपादन केला. बनावट कागदपत्र त्यांना दाखवून त्यांना ठाणे मेंटल हॉस्पिटल मधील जेवणाचे कंत्राट मिळवून देण्याचे आमिष दाखवले. त्यांच्याकडून वेळोवेळी दहा लाख रुपये घेऊन आजपर्यंत ते परत न करता तसेच त्यांना कोणत्याही प्रकारचे कंत्राट मिळवून न देता फसवणूक करण्यात आली.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.