PUNE: महापारेषणचा टॉवर पाडून पळवल्या १० हजार किलोंच्या तारा

पुणे : महापारेषण कंपनीचा जेजूरी ते हिंजवडी या अति उच्चदाब विद्युत वाहिनीच्या लाईनवरील विद्यूत मनोरा (टॉवर) खाली पाडून त्याचे नुकसान करीत तब्बल १० हजार ६२१ किलोच्या अल्यूमिनियमच्या तारा लंपास

संग्रहित छायाचित्र

हवेली तालुक्यातील भगतवाडी येथे घडला प्रकार

पुणे : महापारेषण कंपनीचा जेजूरी ते हिंजवडी या अति उच्चदाब विद्युत वाहिनीच्या लाईनवरील विद्यूत मनोरा (टॉवर) खाली पाडून त्याचे नुकसान करीत तब्बल १० हजार ६२१ किलोच्या अल्यूमिनियमच्या तारा लंपास करण्यात आल्या. हा प्रकार हवेली तालुक्यातील भगतवाडी येथे घडला. याप्रकरणी उत्तमनगर पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध भादवि ३७९, ४२७, भारतीय विद्युत अधिनियम (सुधारणा) २००३ कलम १३६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार २८ डिसेंबर २०२३ ते ६ जानेवारी २०२४ या कालावधीदरम्यान घडला. (Pune Crime News)

याप्रकरणी सहाय्यक अभियंता आकाश नामदेव गायकवाड (वय ३२, रा. धायरी) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महापारेषण कंपनीकडून जेजूरी ते हिंजवडी या अतिउच्चदाब वाहिनीच्या लाईनचे काम सुरू आहे. या कामाला २०१४ मध्ये सुरुवात करण्यात आली होती. भगतवाडी येथील टॉवर क्रमांक २४ आणि २५ या दरम्यानचे काम स्थानिक विरोधामुळे २०१८ साली बंद पडले. बऱ्याच ठिकाणी हे काम अर्धवट पडलेले आहे. या दोन टॉवरला जोडणाऱ्या अल्यूमिनियमच्या तारा याठिकाणी ठेवण्यात आल्या होत्या. याठिकाणी उभारण्यात आलेला २४/१ हा मनोरा अज्ञात आरोपींनी तोडला. या वाहिनीच्या बहुली-भगतवाडी येथील कामासाठी आणलेल्या ६४० स्क्वेअर मिलीमीटर जाडीच्या तब्बल १० हजार ६२१ किलो वजनाच्या तारा चोरट्यांनी लंपास केल्या. त्याची अंदाजे किंमत ५ लाख रुपये असल्याचे फिर्यादीमध्ये नमूद करण्यात आल्याचे वरिष्ठ निरीक्षक किरण बालवडकर यांनी सांगितले.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest