सुनील टिंगरे यांचा विजय निश्चित : माजी आमदार जगदीश मुळीक यांचा दावा

पुणे : तेवीस तारखेला सुनील टिंगरे यांचा विजय निश्चित आहे. विरोधकांच्या अफवांवर विश्वास न ठेवता महायुतीच्या कार्यकर्त्यांनी प्रत्येक मतदारापर्यंत पोहचून प्रचार करावा, असे आवाहन माजी आमदार जगदीश मुळीक यांनी केले.

Sunil Tingre,victory,Former, MLA ,Jagdish Mulik,Mahayuti

महायुतीचे उमेदवार सुनील टिंगरे आणि माजी आमदार जगदीश मुळीक

अफवांवर विश्वास न ठेवता प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचण्याचे मुळीक यांचे महायुतीच्या कार्यकर्त्यांना आवाहन

पुणे : तेवीस तारखेला सुनील टिंगरे यांचा विजय निश्चित आहे. विरोधकांच्या अफवांवर विश्वास न ठेवता महायुतीच्या कार्यकर्त्यांनी प्रत्येक मतदारापर्यंत पोहचून प्रचार करावा, असे आवाहन माजी आमदार जगदीश मुळीक यांनी केले. टिंगरेनगर येथील महायुतीच्या महाबैठकीत कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. 

महायुतीचे सरकार महिला, शेतकरी, विद्यार्थी व विविध सामाजिक घटकांना विचारात घेऊन विकासाची प्रचंड कामे करीत आहे. विरोधकांकडे प्रचाराचा मुद्दा नसल्याने अफवा पसरविल्या जात आहेत. हा फुटला, तो फुटला अशा अफवांवर विश्वास ठेवू नका. सगळे इथेच आहेत. महायुती भक्कम आहे. सर्वजण एकदिलाने काम करीत आहेत. सुनील टिंगरे हे महायुतीचे म्हणजेच आपल्या सर्वांचे उमेदवार आहेत, हे मतदारांना समजावून सांगण्याचे आवाहनही मुळीक यांनी उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांना केले. 

भाजपचे पुणे शहराध्यक्ष धीरज घाटे यांनीही उपस्थित कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. ते म्हणाले, मोदीजींच्या नेतृत्वातील सरकार केंद्रात उत्कृष्ठ काम करीत आहे. महाराष्ट्रातही आपल्याला त्याच विचारांचे सरकार आणायचे आहे. त्यासाठी महायुतीतील सर्व घटक पक्षांनी मित्रपक्षांचा एकदिलाने प्रचार करायचा आहे. मोदींच्या सभेनंतर महायुतीसाठी वातावरण अधिकच अनुकूल होणार आहे, असा दावा त्यांनी केला.

 मंगळवारी सकाळी वडगावशेरी भागातील सुनीता नगर, साईनगरी, गणेशनगर भागात प्रचार करण्यात आला. या वेळी महायुतीचे उमेदवार सुनील टिंगरे, माजी आमदार जगदीश मुळीक, नारायण गलांडे, संदीप जऱ्हाड, ज्ञानेश्वर शिंदे, उषा कळमकर, महेश गलांडे, विशाल साळी, आशा जगताप, मनोज पाचपुते, महेश गलांडे, ज्योती जावळकर, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

चंदननगर परिसरात उभारण्यात आलेले राजमाता जिजाऊ उद्यान हे पुण्यातील सर्वात मोठे व उत्कृष्ट असे उद्यान आहे. नगर  रस्त्यावरील बीआरटी हटविल्यामुळे वाहतूक कोंडीतून नागरिकांची सुटका झाली आहे. शास्त्रीनगर चौकातील ग्रेड सेपरेटर व उड्डाणपूल, शिरूर ते रामवाडी दुमजली उड्डाणपूल, मेट्रो यांमुळे परिसरातील वाहतूक व्यवस्था पूर्णपणे बदलून जाणार आहे. परिसरातील पाणीपुरवठा, मूलभूत सुविधा यांसाठी भरीव काम केल्यामुळे मतदार पाठीशी असल्याचा दावा टिंगरे यांनी केला आहे.

अभिनेते भाऊ कदम यांच्या उपस्थितीमुळे टिंगरे यांच्या पदायात्रेची 'हवा' :

सोमवारी संध्याकाळी प्रसिद्ध सिने अभिनेते भाऊ कदम सुनील टिंगरे यांच्या पदयात्रेत सहभागी झाले होते कदम यांच्या उपस्थितीमुळे टिंगरेंच्या पदयात्रेची मांजरी भागात चांगलीच 'हवा' झाल्याचे चित्र पाहायला मिळाले. नागरिक भाऊ कदम यांच्याबरोबर फोटो, सेल्फी काढण्यासाठी चढाओढ करीत होते. या वेळी कदम यांनी मतदारांना टिंगरे यांना मतदान करण्याचे आवाहन मतदारांना केले.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest