Pune News : वर्ष सरताना मलनि:सारण विभागाच्या सुमारे २० निविदांना मंजूरी

साहेब आमच्या भागातील ड्रेनेज लाईन आठवड्याभरापासून तुंबली आहे. अनेक वेळा तक्रार करुनही कामे होत नाही. काम कधी पर्यंत होईल, अशा अशयाच्या तक्रारी महापालिकेकडे आणि लोकप्रतिनिधींकडे सातत्याने येत आहेत.

Pune News

वर्ष सरताना मलनि:सारण विभागाच्या सुमारे २० निविदांना मंजूरी

ठेकेदारांनी रिंग केल्याच संशय; चौकशी करण्याची नागरिकांची मागणी

पुणे: साहेब आमच्या भागातील ड्रेनेज लाईन आठवड्याभरापासून तुंबली आहे. अनेक वेळा तक्रार करुनही कामे होत नाही. काम कधी पर्यंत होईल, अशा अशयाच्या तक्रारी महापालिकेकडे आणि लोकप्रतिनिधींकडे सातत्याने येत आहेत. काम करण्याऐवजी या कामासाठी आमच्या विभागाकडे निधीच नाही, असे सांगून कामे टाळली जात आहेत. मात्र आता वर्ष सरताना मलनि:सारण विभागाला जाग आली असून या कामाच्या सादर केलेल्या सुमारे २० निविदांना स्थायी समितीने मान्यता दिली असून या कामांसाठीच्या निविदा या चार टक्के कमी दराने आल्या असल्याने यानिविदांमध्ये रिंग झाली असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. (Pune News) 

महापालिकेच्या नगरसेवकांकडून दरवर्षी स यादी दिली जाते. या यादीत कामे सूचविली जातात. मात्र नगरसेवक नसल्यामुळे महापालिकेचा कारभार आयुक्तांकडे आहे.  वर्षभर या कामांकडे दुर्लक्ष केल्यानंतर आता आर्थिक वर्ष संपत आलेले असताना विविध कामे करण्यासाठीचे प्रस्ताव मान्य करुन घेतले आहेत. महापालिका आयुक्तांनी नवीन अंदाजपत्रक अद्यप सादर केले नाही. नवीन अंदाजपत्रक सादर करण्याच्या अगोदर मलनि:सारण विभागाने निविदा पाऊस पाडला आहे. शहरातील विविध भागामध्ये मलवाहिन्या टाकण्यासाठी निविदा काढण्यात आल्या आहेत. विशेष बाब म्हणजे यासर्व निविदा एकाच स्थायी समिती बैठकीत मान्य करण्यात आल्या आहेत. एकाच वेळी सर्व भागातील निविदा कशा काय मान्यतेला आल्या. वर्ष संपत असतानाच या निविदा काढण्यात आल्यामुळे मोठयाप्रमाणात संशय व्यक्त केला जाऊ लागला आहे.

काही निविदा तर 30 टक्यांपेक्षा जास्त कमी दराने आल्या आहेत. त्यामुळे ४ टक्के आणि ३० टक्के यांचा ट्रेंड सुध्दा कोठेच जुळत नाही.

पुणे कॅन्टोमेंट मतदारसंघामध्ये अमजदखान चौक येथे मलवाहिनी टाकणे ९५ लाख १० हजारांची निविदा काढण्यात?आले ही निविदा सुध्दा ४ टक्के कमी दाराने आली आहे. बीटी कवडे रस्ता याठिकाणी मलवाहिनी टाकणे ४९ लाख रुपयांची निविदा ४ टक्के कमी दराने आली असून मान्य करण्यात आली आहे. आदिमाता मंदिर याठिकाणी मलवाहिनी टाकणे ४८ लाख रुपांची निविदा असून ४ टक्के कमी दराने आली आहे.

नवदीप मंडळ ते डांबरे चावडी फडके हौद २८ लाख रुपयांची निविदा ४ टक्के कमी दाराने. आंबेडकरनगर  ४९ लाख रुपयांची निविदा ४ टक्के कमी दराने. प्रभाग क्रमांक ३६ लोअर इंदिरानगर ६० लाख रुपयांची निविदा ४ टक्के कमी दराने. जिजाऊ सोसायटी प्रभाग क्रमांक ३६ मध्ये मलवाहिनी टाकणे ६० लाख , ४ टक्के कमी दराने, प्रभाग क्रमांक १८- ९९ लाख रुपयांची निविदा ४ टक्के कमी दाराने आली असूणन स्थायी समितीने सर्व विविदा मान्य केल्या आहेत. विशेष म्हणजे ४ ते ५ ठेकेदारानांचा या निविदा अलटून पालटून मिळाल्या आहेत.

कृष्णानगर ते मोहमंदवाडी याठिकाणी  सिमा भिंत बांधणे यासाठी ५७ लाख रुपयांची निविदा मागवण्यात आली असून महापालिकेला ४ टक्के कमी दराने आलेली निविदा मान्य केली आहे. प्रभाग क्रमांक ३३ मध्ये मलवाहिनी टाकणे ७२ लाख रुपयांची निविदा आहे.  ४ टक्के कमी दराने आलेली ही निविदा मान्य करण्यात आली आहे. राजेवाडी भागात मलवाहिन्या टाकणे ४८ लाख रुपयांची निविदा असून  ४ टक्के कमी दाराने  कमी आली असून मान्य करण्यात आली आहे.

आर्थिक वर्ष संपत असताना अशा प्रकारे कोटयवधी रुपयांच्या मलनि:सारण विभागाने निविदा काढल्या आहे. विशेष म्हणजे काही अपवाद वगळता सर्व निविदा ४  टक्के कमी दराने आल्यामुळे संशय व्यक्त करण्यात येत आहे. ठेकेदारांनी यामध्ये रिंग केल्याचा आता आरोप होत आहे. महापालिका प्रशासनाने याकडे लक्ष देण्याची आवश्यकता आहे. तसेच आर्थिकवर्ष संपत असताना अशा प्रकारच्या कारभाराची चौकशी होणे आवश्यक आहे, अशी मागणी केली जात आहे.

 बजेट संपविण्यासाठी महापालिकेकडून निविदा प्रसिध्द करण्याचा खेळ खेळला जातो. प्रत्यक्षात ही कामे होतात का याची पाहणी करण्याची यंत्रणा महापालिकेकडे नाही. वर्षभर कामे केली जात नाहीत. नेमके वर्ष सरताना कामांसाठी पैसे खर्च करणार असल्याचे दाखविले जाते.

 - विवेक वेलणकर, सजग नागरिक मंच.

Share this story

Latest