बावधनमध्ये 'दम मारो दम'; कारवाईनंतरही पब पुन्हा सुरू झाल्याने पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह

गेल्या अनेक दिवसांपासून बावधन परिसरातील एका पबमध्ये अनधिकृतपणे हुक्का पार्लर सुरू असल्याची बाब उघडकीस आली आहे. हुक्का पार्लरसाठी कोणतीही परवानगी न घेता ग्राहकांना हुक्का पिण्यासाठी दिल्याने पोलिसांनी १२ जानेवारी रोजी या पबवर कारवाई केली आहे. यापूर्वीही या पबवर कारवाई झाली होती. मात्र त्यानंतरही पुन्हा हा पब सुरू असल्याने बावधन पोलीस ठाण्याच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Desk User
  • Wed, 15 Jan 2025
  • 02:17 pm
Civic Mirror, सीविक मिरर, Pune Mirror, Pune Times Mirror, Pune, Pune News

बावधनमध्ये 'दम मारो दम'

पबमध्ये अनधिकृतपणे सुरू असणाऱ्या हुक्का पार्लरवर कारवाई

गेल्या अनेक दिवसांपासून बावधन परिसरातील एका पबमध्ये अनधिकृतपणे हुक्का पार्लर सुरू असल्याची बाब उघडकीस आली आहे. हुक्का पार्लरसाठी कोणतीही परवानगी न घेता ग्राहकांना हुक्का पिण्यासाठी दिल्याने पोलिसांनी १२ जानेवारी रोजी या पबवर कारवाई केली आहे. यापूर्वीही या पबवर कारवाई झाली होती. मात्र त्यानंतरही पुन्हा हा पब सुरू असल्याने बावधन पोलीस ठाण्याच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.

म्हाळुंगे येथे बॉम्बे बिस्ट्रो रेस्ट्रो बारमध्ये सुरू असलेल्या हुक्का पार्लरवर बावधन पोलिसांनी कारवाई केली. यामध्ये ६ हजार ४०० किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सौम्यरंजन शिशिरकुमार बेहरा (वय २१, रा. वाकड), राहुल श्रीकांत कुलकर्णी (वय ३७, रा. भूगाव, पुणे) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. या प्रकरणी पोलीस अंमलदार दत्तात्रय शिंदे यांनी बावधन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बावधन पोलीस ठाण्याच्या हद्दीत म्हाळुंगे येथे बॉम्बे बिस्ट्रो रेस्ट्रो बारमध्ये हुक्का पार्लर सुरू असल्याची माहिती बावधन पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी हॉटेलवर छापा मारून कारवाई केली. हॉटेलमध्ये हुक्क्याचा वेगळा झोन न करता गिऱ्हाईकांची गर्दी करून त्यांना जेवणास व हुक्का पिण्यास एकत्र बसवल्याचे आढळले. हॉटेलमध्ये विनापरवाना बेकायदेशीरपणे हुक्का पार्लर सुरू होता. याबाबत पोलिसांनी कारवाई करत हॉटेल कामगार सौम्यरंजन आणि मॅनेजर राहुल कुलकर्णी यांच्यावर गुन्हा नोंदवला आहे. कारवाई मध्ये सहा हजार चारशे रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. बावधन पोलीस तपास करीत आहेत.

पबमुळे अनेक समस्या

बावधन परिसरात बॉम्बे बिस्ट्रो रेस्ट्रो हा एकमेव मोठा पब आहे. हा पब रात्री उशिरापर्यंत सुरू असतो. तसेच ग्राहकांचीही येथे मोठ्या प्रमाणात गर्दी होते. पबमध्ये नेहमीच वेगवेगळे इव्हेंट आयोजित केले जात असल्याने या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी होते. परिणामी येथे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीही होते. तसेच या पबमध्ये अनेक वेळा ग्राहकांमध्ये वाद झाल्याच्या घटनाही घडल्या आहेत.

उद्योजकाच्या पार्टीमुळे पोलीस ठाण्यावर मोर्चा

डिसेंबर महिन्यात एका बड्या उद्योजकाच्या वाढदिवसानिमित्त बावधन येथील कोकाटे वस्ती येथे मोठ्या पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. या पार्टीत प्रसिद्ध गायकांना बोलावून त्यांचे कॉन्सर्ट करण्यात आले. तसेच दारूचेही वितरण करण्यात आले. या पार्टीमध्ये मोठ-मोठे डीजे लावण्यात आल्याने गाण्यांचा आवाज बाहेर तसेच आसपासच्या परिसरात जात होता. अनेक नागिरकांनी या बाबत बावधन पोलिसांकडे तक्रार केली. मात्र, त्यावर काही कारवाई झाली नाही. त्यामुळे पार्टीच्या दुसऱ्या दिवशी शंभर ते दीडशे स्थानिक नागरिकांनी बावधन पोलीस ठाण्यावर मोर्चा नेला. त्यानंतर संबंधित पार्टीच्या आयोजकांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता.

राजकीय लोकांचा वरदहस्त

शहरातील अनेक पबमध्ये हॉटेल व्यावसायिकांबरोबर राजकीय लोकांची भागीदारी आहे. हे राजकीय लोक स्लीपिंग पार्टनर म्हणून काम करतात. पबमध्ये चालणाऱ्या अनेक अनधिकृत गोष्टी या राजकीय लोकांच्या वरदहस्तामुळे चालतात. मात्र, जेव्हा कधी पबवर कारवाई होते तेव्हा पबच्या मॅनेजर किवा अन्य कामगारांवर गुन्हा दाखल होतो. या हॉटेलमध्ये काही महिन्यांपूर्वी वादातीत प्रकार घडल्यानंतर कारवाई झाली होती. मात्र, त्यानंतरही पुन्हा हा पब सुरू राहिला असून, शहरातील एका बड्या नेत्याच्या मध्यस्थीने हा पब उशिरापर्यंत सुरू राहात असल्याचे बोलले जात आहे.

संबंधित हॉटेलमधील दारू विक्रीचा परवाना एका महिलेच्या नावावर असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. तसेच हॉटेलमालकाचा शोध सुरू आहे. यात किती भागीदार आहेत, भाडेकरार आहे का, याबाबत तपास सुरू आहे.      -अनिल विभुूते, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, बावधन

Share this story

Latest