पुणे : जेल रोडवर 70 वर्षे जुने वडाचे झाड कोसळले, साडेसहा तास वाहतूक ठप्प

ऐतिहासिक वारसा लाभलेल्या येरवडा कारागृह -विश्रांतवाडी मार्गावर सत्तर वर्षाचे जुने वडाचे झाड रस्त्यावर कोसळल्यामुळे या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. यामध्ये कोणत्याही प्रकारची जिवीतहानी झाली नसल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Admin
  • Edited By Amol Warankar
  • Wed, 24 Apr 2024
  • 03:41 pm
Pune News

पुणे : जेल रोडवर 70 वर्षे जुने वडाचे झाड कोसळले, साडेसहा तास वाहतूक ठप्प

ऐतिहासिक वारसा लाभलेल्या येरवडा कारागृह -विश्रांतवाडी मार्गावर सत्तर वर्षाचे जुने वडाचे झाड रस्त्यावर कोसळल्यामुळे या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. यामध्ये कोणत्याही प्रकारची जिवीतहानी झाली नसल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. (Pune News) 

बुधवारी सकाळी सहाच्या सुमारास सत्तर वर्षे जुने असलेले वडाचे झाड रस्त्यावर कोसळल्यामुळे हा मार्ग वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला होता. सकाळच्या सुमारास हा प्रकार घडल्याने रस्त्यावर वाहनांची वर्दळ कमी असल्याने जिवीतहानी टळल्याचा दावा पालिका अधिकाऱ्यांनी केला आहे. यावेळी दौलतराव जाधव प्रशिक्षण केंद्राच्या नामफलकाचे नुकसान झाले आहे. भिंती देखील पडल्याचे दिसून येत आहे .याबरोबरच झाड पडल्याने परिसरातील वीजपुरवठा खंडीत झाला होता.

पालिकेच्या वतीने घटनेची माहिती महावितरण विभागास देण्यात आल्यावर अनुचित घटना घडू नये. याकरिता परिसरातील वीजपुरवठा खंडीत करण्यात आला होता. विशेष म्हणजे हा मार्ग वाहतुकीसाठी बंद करून येणारी वाहने ही गोल्फ चौक मार्गे वळविण्यात आले होते. सकाळच्या सुमारास हा प्रकार घडल्याने येरवडा कारागृह कर्मचारी व येरवडा पोलीस स्टेशन कर्मचाऱ्यांच्या वतीने पालिका उद्यान विभागास घडलेल्या घटनेची माहिती तात्काळ देण्यात आल्याने पालिका उद्यान विभागाचे अधिकारी,कर्मचारी व अग्नीशामक दल पथकाचे वाहन व कर्मचारी घटनास्थळी हजर राहून या ठिकाणी झाडांच्या फांद्यासह व खोडांची छाटणी करण्यात आली.

या मार्गावरील इतर वाहनचालकांना घटनेची माहिती कळावी याकरिता वाहतूक नियंत्रण कक्षाच्या वतीने नामफलक लावून परिसरात वाहतूक पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले होते. परिसरातील वाहतूक सुरळीत करण्यासाठी वाहतूक पोलिसांना भर उन्हात कसरतच करावी लागली.मध्यंतरी दिड महिन्यापूर्वी कल्याणीनगर परिसरात दोन झाडे रस्त्यावर पडल्याने या घटनेत दोन युवक बालंबाल बचावले होते.तर घटनेत दोन दुचाकीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते.आजच्या घटनेत कोणत्याही वाहनांचे नुकसान न झाल्याने व जिवीतहानी न झाल्यामुळे पालिका अधिकाऱ्यांनी सुटकेचा श्वास सोडला.याबरोबरच पडलेल्या झाडांच्या खोडाची व फांद्यांची तब्बल साडेसहा तास छाटणी करून त्यानंतर हा मार्ग वाहतुकीसाठी खुला करण्यात अधिकाऱ्यांना यश आले.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest