संग्रहित छायाचित्र
पुणे : येरवडा येथील महिला कैद्यांसाठी ‘डिहायड्रेटेड प्लॉवर क्राफ्ट’ हा अभ्यासक्रम सुरू करण्यात आला आहे. महाराष्ट्र राज्य मानवी हक्क आयोग, मुंबई यांच्या मार्फत आणि लखनऊच्या राष्ट्रीय वनस्पती संशोधन संस्थेच्या (नॅशनल बोटॅनिकल रिसर्च इन्सिटट्युट) सहकार्याने हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. त्याचे उद्घाटन मंगळवारी करण्यात आले. याप्रशिक्षणात ५९ महिला कैद्यांनी सहभाग घेतला.
डॉ. अतुल बत्रा व डॉ. श्वेता सिंग यांनी डिहायड्रेटेड फुल, पाने, झाड यांच्यापासून ग्रीटींग कार्ड, वॉल हॅगिंग, सीनरी बुक मार्क्स, पेपर वेट, लैप शेड्स, टेबल टॉप्स, कृत्रिम आभुषण आदी शोभेच्या वस्तू तयार करण्यासंदर्भात मार्गदर्शन केले. तसेच, महिला कैद्यांकडून ग्रीटींग कार्ड तयार करुन घेण्यात आले.
हा उपक्रम कारागृह व सुधारसेवा विभागाचे अतिरिक्त पोलीस महासंचालक व महानिरीक्षक प्रशांत बुरडे, विशेष पोलीस महानिरीक्षक (मुख्यालय) डॉ. जालिंदर सुपेकर यांच्या संकल्पनेमधून, उपमहानिरीक्षक स्वाती साठे, महाराष्ट्र राज्य मानवी हक्क आयोगाच्या प्रबंधक स्वरुपा ढोलम यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आला.
येरवडा मध्यवर्ती कारागृहाचे अधीक्षक सुनिल ढमाळ, अतिरिक्त अधीक्षक पी. पी. कदम, तुरुंगाधिकारी मनिषा मराडे, पी. पालोदकर, रुणाक्षी गवळी, शिक्षिका, महिला अधिकारी व कर्मचारी, सामाजिक कार्यकर्त्या हिना सय्यद यांनी नियोजन केले.