एआरएआय टेकडीवर येणाऱ्या नागरिकांशी चंद्रकांत पाटील यांनी साधला संवाद ; पालकमंत्री या नात्याने रस्त्याच्या कामाला स्थगिती दिल्याचे सांगितले

पर्यावरण दिनाव्यतिरिक्त 'एक पेड मॉं के नाम' उपक्रमांद्वारे माननीय नरेंद्र मोदीजी यांनी पर्यावरण रक्षणासाठी चळवळ उभारली. त्याशिवाय माझ्या ६५ व्या वाढदिवसानिमित्त ६५ हजार वृक्ष लागवड करुन ती जगवली देखील.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Desk User
  • Sun, 10 Nov 2024
  • 01:24 pm
Civic Mirror, सीविक मिरर, Pune Mirror, Pune Times Mirror, Pune, Pune News

संग्रहित छायाचित्र

पर्यावरण दिनाव्यतिरिक्त 'एक पेड मॉं के नाम' उपक्रमांद्वारे माननीय नरेंद्र मोदीजी यांनी पर्यावरण रक्षणासाठी चळवळ उभारली. त्याशिवाय माझ्या ६५ व्या वाढदिवसानिमित्त ६५ हजार वृक्ष लागवड करुन ती जगवली देखील. पालकमंत्री नात्याने रस्त्याच्या कामाला स्थगितीच दिली आहे, तरीही निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर टेकडीचा मुद्दा काढून संभ्रम निर्माण केला जात असल्याची भावना चंद्रकांतदादा पाटील यांनी आज व्यक्त केली.

कोथरूड विधानसभा मतदारसंघातील भाजपा महायुतीचे उमेदवार चंद्रकांतदादा पाटील यांनी आज एआरएआय टेकडीवर जाऊन टेकडीवर येणाऱ्या संवाद साधला. यावेळी त्यांनी भारतीय जनता पक्षाची भूमिका मांडली. 

ते म्हणाले की, पर्यावरण संवर्धनासाठी माननीय नरेंद्र मोदीजी यांनी 'एक पेड मॉं के नाम' उपक्रमांद्वारे लोकचळवळ सुरू केली. त्यामुळे देशभरात मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड झाली. याशिवाय गेल्या देवेंद्रजींच्या सरकार मध्ये तत्कालीन वनमंत्री सुधीरभाऊ मुनगंटीवार यांनी ही 'हरित महाराष्ट्रा'साठी पाच वर्षे वृक्ष लागवडीचा संकल्प केला. त्यामधून ही मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड झाली. मविआ सरकारने याची चौकशी लावली. त्यामधून महाराष्ट्राच्या विविध भागांत वृक्ष लागवड झाल्याचे निष्पन्न झाले.  

ते पुढे म्हणाले की, यंदा माझा ६५ वा वाढदिवस संपन्न झाला. त्यामुळे मी कोथरुडसह सर्वत्र ६५ हजार वृक्ष लागवड आणि संवर्धनाचा संकल्प करुन; तो सत्यात उतरवला. कोथरूड मधील म्हातोबा टेकडीवर ६५०० वृक्षांची लागवड करुन त्याचे संवर्धन करत आहे. पुणे जिल्ह्याचा पालकमंत्री पदाच्या कार्यकाळात बालभारती पौड रस्त्याच्या कामाला स्थगितीच दिली आहे, अशी भावना व्यक्त केले. 

यावेळी भाजप कोथरुड दक्षिणचे अध्यक्ष डॉ संदीप बुटाला, नगरसेविका छाया मारणे, भाजपा नेते बाळासाहेब टेमकर, अमोल डांगे, अनिता तलाठी, आशुतोष वैशंपायन, सुरेखा जगताप, दीपक पवार, अजय मारणे, रणजित हरपुडे, मधुरा वैशंपायन यांच्या सह भाजपचे इतर पदाधिकारी आणि पर्यावरण प्रेमी उपस्थित होते.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest