अल्पवयीन मुलीच्या विवाहाचे अरिष्ट टळले

पती व पत्नीच्या भांडणात पत्नीला बाहेर काढणाऱ्या पतीने नंतर स्वतःच्या अल्पवयीन मुलीचे १३० किलो वजनाच्या ३२ वर्षीय वकीलाशी घाईने लग्न लावून देण्याचा प्रयत्न मुंबई उच्च न्यायालयाच्या मदतीने असफल ठरला असून मुंबई उच्च न्यायालयाने पुणे पोलिसांच्या भरोसा सेलला चौकशी करून चार आठवड्यात अहवाल देण्याचे आदेश दिले आहेत.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Desk User
  • Sun, 10 Nov 2024
  • 01:15 pm
Civic Mirror, सीविक मिरर, Pune Mirror, Pune Times Mirror, Pune, Pune News

संग्रहित छायाचित्र

मुंबई उच्च न्यायालयाचा आईला दिलासा, वडिलांनीच केला १३० किलो वजनाच्या व्यक्तीशी मुलीचा विवाह लावण्याचा प्रयत्न

पती व पत्नीच्या भांडणात पत्नीला बाहेर काढणाऱ्या पतीने नंतर स्वतःच्या अल्पवयीन मुलीचे १३० किलो वजनाच्या ३२ वर्षीय वकीलाशी घाईने लग्न लावून देण्याचा प्रयत्न मुंबई उच्च न्यायालयाच्या मदतीने असफल ठरला असून मुंबई उच्च न्यायालयाने पुणे पोलिसांच्या भरोसा सेलला चौकशी करून चार आठवड्यात अहवाल देण्याचे आदेश दिले आहेत.

कोंढवा परिसरातील या दांपत्यातील भांडण असताना पतीने पत्नीला घराबाहेर काढले होते. अल्पवयीन मुलगी मात्र पित्याच्या ताब्यात होती.या पित्याने मुलगी कायद्याने सज्ञान होण्याआधीच स्वतःच्या वकीलाशी तिचे लग्न ठरवण्याचा  घाट घातला व मुलगी १८ वर्षाची झाल्याबरोबर १० नोव्हेंबर रोजी घाईने लग्न उरकण्याच्या तयारीत होता. हा वकील १३० किलो वजनाचा आहे. या कटाचा सुगावा लागताच पत्नीने पोलिसांच्या भरोसा सेल कडे तक्रार केली.भरोसा सेलने पत्नीचे माहेर असलेल्या चिखली पोलीस ठाण्यात प्रकरण पाठवले. हे लेखी आदेश पोहचले नाहीत. त्यामुळे मुलीच्या आईने मुंबई उच्च न्यायालयात दाद मागितली. अरिफ डॉक्टर  आणि सोमशेखर सुदर्शन या सुट्टीतील संयुक्त पिठाने भरोसा सेलला चार आठवड्यात चौकशी करून अहवाल देण्याचे आदेश दिले. दरम्यान, लग्न करू पाहणाऱ्या वकिलाने उच्च न्यायालयासमोर व्हर्चूअली उपस्थित राहून कबुली देत हे लग्न अनिश्चित काळासाठी पुढे ढकलत असल्याचे सांगितले. त्यामुळे आईला वाटत असलेले मुलीवरील अरिष्ट टळले. या प्रकरणी आईच्या बाजूने एड. समीर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली एड. आदिल शेख, एड. इरफान उनवाला यांनी काम पाहिले.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest