संग्रहित छायाचित्र
विधानसभा निवडणुकीत दिव्यांगांना मतदान करता यावे, याकरिता निवडणूक विभागाकडून विविध सोयी-सुविधा उपलब्ध करणार आहे. यामध्ये १२ हजार १०१ दिव्यांग मतदार चिंचवड विधानसभा मतदारसंघात तर सर्वात कमी म्हणजेच १ हजार ६८९ दिव्यांग मतदार मावळ मतदारसंघात आहेत.
दिव्यांग मतदारांसाठी सर्व मतदान केंद्रांवर रॅम्पची सुविधा, पुरेशा व्हील चेअर्स, वाहन व्यवस्था, स्वतंत्र रांगा, ब्रेल लिपीतील साहित्य, कर्णबधिर दिव्यांगांसाठी दुभाषक, साहाय्यक, प्रतीक्षालय, फॉर्म १२ ड भरून घरातूनच मतदानाची सोय, ९२२६३६३००२ हा हेल्पलाईन क्रमांक आदी सोयी- सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. ‘सक्षम’ ॲपच्या माध्यमातून दिव्यांग मतदारांच्या मागणीप्रमाणे मतदारसंघनिहाय सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत, अशी माहितीही निवडणूक प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे.
२१ विधानसभेत ९० हजार दिव्यांग मतदार
जिल्ह्यात २१ विधानसभा मतदारसंघात मिळून ९० हजार १३४ दिव्यांग मतदार आहेत. यात अस्थिव्यंग, कर्णबधिर, अल्पदृष्टी आणि इतर प्रकारच्या दिव्यांग मतदारांचा समावेश आहे. जुन्नर मतदारसंघात १ हजार ९१७, आंबेगाव २ हजार ७७६, खेड- आळंदी ३ हजार ६१२, शिरूर ३ हजार ९८६, दौंड ३ हजार १८०, इंदापूर २ हजार १२, बारामती ४ हजार ९८०, पुरंदर ४ हजार ३१३, भोर ६ हजार ८०, मावळ १ हजार ६८९, चिंचवड १२ हजार १०१, पिंपरी ४ हजार २५१, भोसरी ७ हजार १४३, वडगाव शेरी ३ हजार ५३७, शिवाजीनगर २ हजार २१६, कोथरूड २ हजार ८१४, खडकवासला ३ हजार ४३९, पर्वती ३ हजार ४४०, हडपसर ७ हजार ६१५, पुणे कॅन्टोन्मेंट ५ हजार १०० तर कसबा पेठ मतदारसंघात ४ हजार ८६८ इतके दिव्यांग मतदार आहेत.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.