'एक सोसायटी एक कॅमेरा' सुमारे ५ हजार सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची महत्त्वाकांक्षी योजना

पुणे शहरातील स्फोटांच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने पिंपरी-चिंचवड शहरात १ हजार ४०८ सीसीटीव्ही कॅमेरे बसवले. यानंतर स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत सार्वजनिक ठिकाणी ३ हजार ५०० कॅमेरे लावण्यात आले. हे कॅमेरे वाहतूक नियोजन आणि गुन्ह्यांचा प्रतिबंध यासाठी उपयुक्त ठरत आहेत.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Desk User
  • Fri, 27 Dec 2024
  • 12:44 pm
Civic Mirror, सीविक मिरर, Pune Mirror, Pune Times Mirror, Pune, Pune News

संग्रहित छायाचित्र

पुणे शहरातील स्फोटांच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने पिंपरी-चिंचवड शहरात १ हजार ४०८ सीसीटीव्ही कॅमेरे बसवले. यानंतर स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत सार्वजनिक ठिकाणी ३ हजार ५०० कॅमेरे लावण्यात आले. हे कॅमेरे वाहतूक नियोजन आणि गुन्ह्यांचा प्रतिबंध यासाठी उपयुक्त ठरत आहेत. 

प्रत्येक कार्यालय, दुकान किंवा इमारतीसमोर रस्त्याकडे लक्ष ठेवणारा चांगल्या दर्जाचा कॅमेरा लावावा. यामुळे शहराचा बहुतांश भाग सीसीटीव्हीच्या नियंत्रणाखाली येईल आणि गुन्हे कमी होण्यास मदत होईल, असे आवाहन पिंपरी-चिंचवड पोलिसांनी नागरिकांना केले आहे. नागरिक त्यांच्या घरांभोवती किंवा कार्यालयाभोवती कॅमेरे लावतात, पण रस्त्याकडे लक्ष ठेवण्यासाठी कॅमेरा ठेवायला ते टाळाटाळ करतात. यामुळे चोरी किंवा अन्य घटना घडल्यास केवळ त्या घटनेचा फुटेज मिळतो, पण चोर किंवा आरोपी नेमके कुठून आले आणि कुठे गेले, हे समजायला वेळ लागतो. पोलिसांना नंतर रस्त्याकडे लागलेल्या कॅमेऱ्याचा शोध घ्यावा लागतो, ज्यामुळे वेळ वाया जातो आणि आरोपीला पळून जाण्यास वेळ मिळतो.

जर कॅमेरे रस्त्याकडे ठेवले असतील, तर कोणत्याही गुन्ह्याचे किंवा घटनेचे फुटेज तातडीने मिळू शकते आणि आरोपींची ओळख पटवणे सोपे होईल. सीसीटीव्ही हा समाजाचा 'तिसरा डोळा' आहे, जो नेहमी कार्यरत राहणे गरजेचे आहे.

सीसीटीव्हीच्या मदतीने गंभीर गुन्ह्यांची उकल

पोलिसांनी अनेक गुन्हेगारांना सीसीटीव्ही फुटेजच्या आधारावर अटक केली आहे. शहरात बाहेरून येऊन एटीएम फोडणाऱ्या टोळीला सीसीटीव्हीच्या मदतीने पकडण्यात आले. चिखली येथे नरबळीसाठी तीन वर्षांच्या मुलीचे अपहरण करणाऱ्या आरोपींनाही काही तासांत अटक करण्यात आली. भोसरीत एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून गोव्याला पळून जाणाऱ्या आरोपीलाही सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पकडण्यात आले.

निर्जन भागातही निगराणी आवश्यक

महानगरपालिकेने सार्वजनिक ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवले आहेत. अनेक खासगी संस्थांनीही आपल्या दुकानांसमोर कॅमेरे लावले आहेत. मात्र, शहरातील मोकळ्या जागा, महामार्ग, औद्योगिक वसाहतींतील बंद कंपन्या अशा निर्जन ठिकाणी कॅमेरे लावलेले नाहीत. त्यामुळे अशा ठिकाणी सीसीटीव्ही बसवण्याबरोबरच पोलीस गस्तही वाढवणे गरजेचे आहे.

नागरिकांनी त्यांच्या घरांसमोर आणि दुकांसमोर सीसीटीव्ही कॅमेरे लावले आहेत. मात्र, कॅमेरा अशा प्रकारे लावणे आवश्यक आहे की त्यातून रस्त्यावर देखरेख करता येईल. यामुळे गुन्ह्यांवर नियंत्रण येईल आणि घडलेल्या गुन्ह्यांचा तपास करणे सोपे होईल.- संदीप डोईफोडे, पोलीस उपायुक्त, पिंपरी-चिंचवड

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest