औद्योगिक क्षेत्रात नव्या महापालिकेसाठी हालचाली

चाकण, आळंदी आणि राजगुरुनगर नगर परिषदा मिळून स्वतंत्र महापालिका स्थापन करण्याच्या हालचालींना गती मिळाली आहे. स्वतंत्र महापालिका करण्यासाठी कोणतीही अडचण नाही. तीन नगरपरिषदांची मिळून स्वतंत्र महापालिकेची स्थापना करावी असा अभिप्राय पिंपरी-चिंचवड महापालिकेने शासनाला दिला आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Desk User
  • Fri, 27 Dec 2024
  • 01:13 pm
Civic Mirror, सीविक मिरर, Pune Mirror, Pune Times Mirror, Pune, Pune News

संग्रहित छायाचित्र

चाकण, आळंदी आणि राजगुरुनगर नगर परिषदा मिळून स्वतंत्र महापालिका स्थापन करण्याच्या हालचालींना गती मिळाली आहे. स्वतंत्र महापालिका करण्यासाठी कोणतीही अडचण नाही. तीन नगरपरिषदांची मिळून स्वतंत्र महापालिकेची स्थापना करावी असा अभिप्राय पिंपरी-चिंचवड महापालिकेने शासनाला दिला आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेने अहवाल पाठविला आहे. महापालिकेचे क्षेत्रफळ मोठे आहे. वाढत्या लोकसंख्येला सुविधा पुरविताना महापालिकेवर ताण येत आहे. या भागातील गावे महापालिकेत समाविष्ट करणे शक्य नाही. त्यामुळे चाकण, राजगुरुनगर, आळंदी नगरपरिषदांची मिळून स्वतंत्र महापालिका स्थापन करण्यास कोणतीही हरकत नसल्याचा अभिप्राय पिंपरी महापालिकेने दिला आहे. जिल्हा परिषद प्रशासनानेही अभिप्राय पाठविला आहे. त्यामुळे चाकण, आळंदी आणि राजगुरुनगर नगर परिषदा मिळून स्वतंत्र महापालिका स्थापन करण्याच्या हालचालींना गती मिळाली आहे.

औद्योगिक पट्यातील विकासाला चालना?

उद्योगामुळे चाकण परिसरातील लोकसंख्या वाढत आहे. परिसर विस्तारत आहे. वाढत्या लोकसंख्येला सुविधा पुरविताना चाकण, आळंदी आणि राजगुरुनगर या नगरपरिषदांवर ताण येत आहे. त्यामुळे स्वतंत्र महापालिकेची स्थापना झाल्यास या भागातील विकास कामांना चालना मिळण्याची शक्यता आहे. रस्ते, कचरा, पाणी यासह अन्य बाबींचे नियोजन करणे सुलभ होईल, अशी धारणा प्रशासनाची आहे.

महापालिकेचे क्षेत्रफळ मोठे आहे. त्यामुळे तिन्ही नगरपरिषदांची स्वतंत्र महापालिका स्थापन करण्यास कोणतीही हरकत नाही. तसा अभिप्राय शासनाला पाठविला असल्याचे महापालिकेच्या नगररचना विभागाचे उपसंचालक प्रसाद गायकवाड यांनी सांगितले.

पुणे व पिंपरी-चिंचवड महापालिकेमध्ये मोठ्या प्रमाणात गावांचा समावेश होऊन महापालिकांची हद्दवाढ झालेली आहे. त्यामुळे पुणे व पिंपरी-चिंचवड शहरालगतच्या परिसरातील नवीन गावांचा या दोन्ही महापालिकेत समावेश करणे योग्य होणार नाही. चाकण नगरपरिषद, आळंदी नगरपरिषद व राजगुरू नगरपरिषद तसेच त्यांच्या लगतच्या परिसरातील गावांची नवीन महापालिका निर्माण करण्याबाबत मागणी होत आहे. चाकण, आळंदी आणि राजगुरू नगरपरिषद तसेच त्यांच्या परिसरालगतच्या आसपासच्या गावांचा समावेश करून नवीन स्वतंत्र महापालिका करणे राज्य शासनाच्या विचाराधिन आहे. त्यामुळे राज्य शासनाने चाकण नगरपरिषद, 

आळंदी नगरपरिषद व राजगुरू नगरपरिषद तसेच त्यांच्या लगतच्या परिसरातील आसपासच्या गावांचे एकूण क्षेत्रफळ, लोकसंख्या, हद्द याबाबतचा तपशिल, तिन्ही नगरपरिषदेतील हद्दीची एक स्वतंत्र महापालिका स्थापन करण्याबाबत जिल्हा प्रशासन, महापालिकेकडून अभिप्रायासह अहवाल मागविला होता.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest