Pimpri-Chinchwad: फटाक्यांच्या आतषबाजीने कचऱ्यात वाढ

दिवाळीनिमित्त बाजारात पूजा साहित्य व खरेदीसाठी झालेली गर्दी, फुले आणि फटाक्यांच्या आतषबाजीमुळे मुख्य बाजारपेठा आणि शहराच्या प्रत्येक भागात मोठ्या प्रमाणावर कचरा निर्माण झाला होता. महापालिकेने मुख्य बाजारपेठांबरोबरच शहरातील प्रत्येक भागातील कचरा उचलला. त्यामध्ये चारही दिवस सरासरी १४०० टन कचरा महापालिकेकडून उचलण्यात आला आहे, अशी माहिती आरोग्य अधिकाऱ्यांनी दिली.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Desk User
  • Wed, 6 Nov 2024
  • 01:21 pm
Civic Mirror, सीविक मिरर, Pune Mirror, Pune Times Mirror, Pune, Pune News

संग्रहित छायाचित्र

दिवाळीनिमित्त बाजारात पूजा साहित्य व खरेदीसाठी झालेली गर्दी, फुले आणि फटाक्यांच्या आतषबाजीमुळे मुख्य बाजारपेठा आणि शहराच्या प्रत्येक भागात मोठ्या प्रमाणावर कचरा निर्माण झाला होता. महापालिकेने मुख्य बाजारपेठांबरोबरच शहरातील प्रत्येक भागातील कचरा उचलला. त्यामध्ये चारही दिवस सरासरी १४०० टन कचरा महापालिकेकडून उचलण्यात आला आहे, अशी माहिती आरोग्य अधिकाऱ्यांनी दिली.

दरवर्षी दिवाळीत मोठ्या प्रमाणावर कचरा निर्माण होत असतो. पिंपरी-चिंचवड शहरात यासाठी महापालिकेच्या आरोग्य विभागाची यंत्रणा राबत असते. मुख्य बाजारपेठांमध्ये मोठ्या प्रमाणावर विक्रेते पूजा साहित्य व दिवाळीच्या अन्य साहित्याचे स्टॉल लावत असतात. दिवाळीचा पाडवा संपल्यानंतर स्टॉल्स काढले की, संपूर्ण कचरा रस्त्यावरच पडतो. फुले व अन्य पूजा-साहित्याचा कचरा यामध्ये सर्वाधिक असतो.

दरम्यान, बुधवारी (दि. ३०) वसुबारसच्या दिवशी १,५६७, गुरुवारी १,३७९, लक्ष्मीपूजनादिवशी १,१८२, पाडव्यादिवशी १,१६८ टन कचऱ्याचे संकलन महापालिकेच्या आरोग्य विभागाने केले. तर, दिवाळीच्या आधी तिन्ही दिवशी शहरातील कचऱ्याने उच्चांकी आकडा गाठला होता. याशिवाय नियमित कचरा उचलण्यात आला. नियमितच्या कचरा संकलनात यंदाच्या दिवाळीत २०० टन अतिरिक्त कचऱ्याची भर पडली असल्याची माहिती महापालिका अधिकाऱ्यांनी दिली.

दिवाळीत १,४०० ते १,६०० टन कचरा

दिवाळीच्या निमित्ताने घर, दुकाने आणि अन्य आस्थापनांची स्वच्छता मोठ्या प्रमाणावर केली जाते. तसेच, अन्य बाबी, खरेदी केलेल्या वस्तूंचे रिकामे खाेके, प्लास्टिक कॅरिबॅग अशा अनेक गाेष्टींमुळे कचऱ्याचे प्रमाण वाढते. दिवाळीच्या प्रमुख तीन दिवसांत शहरात सरासरी १,४०० ते १,६०० टन एवढा कचरा जमा झाल्याचा अंदाज महापालिकेकडून वर्तविण्यात आला आहे. इतर दिवशी हा कचरा १,१०० ते १,२०० टन एवढा असतो.

दिवाळीनिमित्त नागरिक घरांची साफसफाई जास्त प्रमाणात करतात. त्यामुळे महापालिकेच्या कचरा संकलन करणाऱ्या गाड्यांमध्ये जास्त कचरा जमा होतो. दिवाळीनिमित्त बाजारातही जास्त वस्तू येत असल्याने बाजारपेठेतही जास्त कचरा साचतो.

- गणेश देशपांडे, मुख्य कार्यकारी अधिकारी, महापालिका

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest