दोन तासांच्या हल्ल्यात १६ पाकिस्तानी सैनिकांचा मृत्यू

खैबर पख्तुनख्वा येथील माकिन पाकिस्तानी सैन्याच्या चौकीवर शनिवारी पहाटे दहशतवाद्यांनी हल्ला केला. या हल्ल्यामध्ये १६ पाकिस्तानी सैनिक मारले गेले तर ५ सैनिक जखमी झाले. अफगाणिस्तान सीमेपासून ४० किमी अंतरावर असलेल्या माकिनमध्ये ही घटना घडली.

Khyber Pakhtunkhwa,Terrorists, attacked, Pakistan, Army post,killed ,incident

संग्रहित छायाचित्र

अफगाणिस्तान सीमाभाग, टीटीपी दहशतवादी संघटनेने घेतली हल्ल्याची जबाबदारी

कराची : खैबर पख्तुनख्वा येथील माकिन पाकिस्तानी सैन्याच्या चौकीवर शनिवारी पहाटे दहशतवाद्यांनी हल्ला केला. या हल्ल्यामध्ये १६ पाकिस्तानी सैनिक मारले गेले तर ५ सैनिक जखमी झाले. अफगाणिस्तान सीमेपासून ४० किमी अंतरावर असलेल्या माकिनमध्ये ही घटना घडली.

वृत्तसंस्था एएफपीला लष्कराच्या एका अधिकाऱ्याच्या हवाल्याने सांगितले की, सुमारे २ तास ३० हून अधिक दहशतवाद्यांनी लष्कराच्या चौकीवर हल्ला केला. यावेळी दहशतवाद्यांनी चौकीवर उपस्थित असलेल्या वायरलेस उपकरणे आणि कागदपत्रांसह अनेक वस्तूंना आग लावली. यानंतर सर्वांनी घटनास्थळावरून पळ काढला. हल्ल्यानंतर परिसराची नाकाबंदी सुरू करण्यात आली आहे. घटनास्थळाजवळ दहशतवाद्यांचा शोध सुरू आहे. तहरीक-ए-तालिबान पाकिस्तान म्हणजेच टीटीपीच्या दहशतवाद्यांनी या घटनेची जबाबदारी घेतली आहे.

दहशतवाद्यांनी लष्करी चौकीवरील हल्ल्याला त्यांच्या वरिष्ठ कमांडर्सच्या हौतात्म्याचा बदला म्हणून वर्णन केले. अहवालानुसार, हल्ल्यादरम्यान दहशतवाद्यांनी मशीनगन, नाईट व्हिजन तंत्रज्ञानासह अनेक महत्त्वाची लष्करी उपकरणे लुटली.अलीकडे, १८ डिसेंबर रोजी, पाकिस्तानी लष्कराने खैबर पख्तूनख्वा, पाकिस्तानमध्ये तीन विविध लष्करी कारवायां करण्यात आल्या होत्या.

ज्यात ११ दहशतवाद्यांना ठार मारल्याचा दावा केला होता.त्याआधी २५ ऑक्टोबर रोजी डेरा इस्माईल खान परिसरात टीटीपीच्या दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. ज्यामध्ये १० पाकिस्तानी सैनिक मारले गेले तर 8 जखमी झाले. हा परिसर अफगाणिस्तान सीमेपासून ७० किमी अंतरावर आहे.या वर्षी सप्टेंबरमध्ये पाकिस्तानचे प्रतिनिधी मुनीर अक्रम यांनी संयुक्त राष्ट्रात म्हटले होते की, टीटीपी जगभरात वेगाने दहशतवादी गटांचा विस्तार करत आहे. आगामी काळात ते अल कायदाच्या सहकार्याने जागतिक दहशतवादाला प्रोत्साहन देऊ शकते.

लष्करावर हल्ला करणाऱ्या २५ आरोपींना शिक्षा झाली

या घटनेशिवाय गेल्या वर्षी मे महिन्यात इम्रान खान यांच्या अटकेदरम्यान पाकिस्तानी लष्करावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी २५ आरोपींना २ ते १० वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. पाकिस्तानी लष्कराने आज ही माहिती दिली आहे. कायदा हातात घेणाऱ्यांना कठोर शिक्षा करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.

टीटीपी म्हणजे काय?

२००७ मध्ये अनेक दहशतवादी गटांनी एकत्र येऊन तहरीक-ए-तालिबान पाकिस्तानची स्थापना केली. टीटीपीला पाकिस्तान तालिबान असेही म्हणतात. पाकिस्तान सरकारने ऑगस्ट २००८ मध्ये टीटीपीवर बंदी घातली होती.ऑक्टोबर २००१ मध्ये अमेरिकन सेनेने तालिबानला अफगाणिस्तानातून सत्तेवरून हद्दपार केले, तेव्हा अनेक दहशतवादी पळून पाकिस्तानात स्थायिक झाले. यानंतर पाकिस्तानी लष्कराने या दहशतवाद्यांविरोधात कारवाई सुरू केली.

दरम्यान, पाकिस्तानी लष्कराने इस्लामाबादची लाल मशीद कट्टरतावादी प्रचारक दहशतवाद्याच्या ताब्यातून मुक्त केली. या घटनेनंतर स्वात खोऱ्यात पाकिस्तानी लष्कराचा विरोध सुरू झाला. त्यामुळे आदिवासी भागात अनेक बंडखोर गट वाढू लागले.यानंतर डिसेंबर २००७ मध्ये बेतुल्ला मेहसूदच्या नेतृत्वाखाली १३ गटांनी आंदोलनात सामील होण्याचा निर्णय घेतला. या संघटनेचे नाव तहरीक-ए-तालिबान पाकिस्तान असे होते.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest