Deepak Kesarkar : घोषणांचा पाऊस पाडणे बंद करा; शिक्षक भरतीची प्रक्रिया सुरु करा

अर्ध शिक्षति शिक्षण मंत्र्याकडून काय आपेक्षा ठेवावी, सत्तेचा माज आहे का, राजीनामा द्या, थोडी शिल्लक असेल तर शिक्षक भरती का, अशा शेलक्या शब्दात राज्याचे शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांचा सोशल माध्यमांवर समाचार घेण्यात आला आहे.

Deepak Kesarkar : घोषणांचा पाऊस पाडणे बंद करा; शिक्षक भरतीची प्रक्रिया सुरु करा

संग्रहित छायाचित्र

शिक्षणमंत्री दीपक केसरकरांवर समाज माध्यमांतून टीकेचा भडीमार; किती दिवस श्रध्दा आणि सबुरी...?

पुणे : खुर्ची खाली करा, घरी राहून आराम करा ! मंत्री महोदय आपण कोणत्या शाळेत शिकला आहात, मुलींना कसे बोलतात हे समजत नाही काय, अर्ध शिक्षति शिक्षण मंत्र्याकडून काय आपेक्षा ठेवावी, सत्तेचा माज आहे का, राजीनामा द्या, थोडी शिल्लक असेल तर शिक्षक भरती का, अशा शेलक्या शब्दात राज्याचे शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांचा सोशल माध्यमांवर समाचार घेण्यात आला आहे. तसेच शिक्षक भरतीच्या घोषणांचा पाऊन पाडणे बंदा करा आणि भरतीची प्रक्रिया सुरु करा अशी मागणी तरुणांनी केली आहे.

राज्यात २०१२ मध्ये शिक्षक भरतीला बंदी घालण्यात आली होती. त्यानंतर २०१७ मध्ये पुन्हा भरती सुरु करण्यात आली. त्यासाठी अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी घेण्यात आली आहे. ही चाचणी परीक्षा घेतल्यानंतर सात महिन्यांनी निकाल लावण्यात आला. त्यानंतर पवित्र पोर्टलवर शिक्षक भरतीची जाहीरात प्रसिध्द करण्यात येणार होती. मात्र प्रत्यक्षात कोणतीही जाहीरातच येत नसल्याने शिक्षक भरतीची वाट पाहणारे हवालदिल झाले असून नौराश्यात जाऊ लागले आहेत. शिक्षक भरतीसाठी वेळ का लागत आहे, असा प्रश्न उमेदवारांना पजला आहे. याबाबत बीड जिल्ह्यात शिक्षक भरतीच्या मुद्द्यावरुन परीक्षा देणाऱ्या उमेदवारांनी शालेय शिक्षण मंत्र्यांना घेराव घातला. त्यावेळी एका महिला उमेदवाराने विचारणा केली असात केसरकर यांचा पारा चढल्याचे दिसून आले.

तुम्हाला आजिबात कळत नाही, तुम्ही शिक्षक होऊ शकता का, तुमची साईड ओपन झालेली आहे. त्यावर तुमचा चॉईस द्या. प्रत्येक जिल्ह्याला जाहीरत देयला सांगितली आहे. असे केसरकर यांनी सांगितल्यानंतर तुम्हाला कळत नाही का, माझी महत्वाची मुलाखत सुरु आहे, त्यात मध्ये येवून बोलता. शिक्षक भरती गेल्या पाच वर्षात कोणी केला का, मी भरतीला सुरवात केली. मला बेशिस्त शिक्षक नकोत. असे केसरकर यांनी महिलेला सुनावले. त्यानंतर महिलेने पुन्हा प्रति प्रश्न विचारल्यानंतर तुमचे नाव घेवून तुम्हाला अपात्र करेल असा केसरकरांनी  दम भरला. या संभाषणाचा व्हिडिओ प्रसार माध्यमांसह समाज माध्यमांवर चांगलाच व्हायरल झाला आहे. त्यामुळे केसरकर यांच्यावर राज्यभरातून संतापाचा लाट पसरली आहे. याचा निषेध करण्यासाठी ट्विटरवर "शिक्षण मंत्र्यांची भाषा बघा'' असा हॅश टॅग तयार करण्यात आला होता. हा हॅश टॅग घेवून राज्यातील जनतेने त्यांच्यावर संताप व्यक्त केला.

राज्य सरकारने पारदर्शक भरती प्रक्रिया राबविण्यासाठी पवित्र पोर्टलची निर्मिती केली आहे. मात्र या पोर्टलवर केवळ उमेदवारांच्या नोंदणीशिवाय अद्याप एकही जाहीरात प्रसिध्द करण्यात आलेली नाही. विधान सभेत मंत्री केसरकर यांनी शिक्षक भरतीची घोषणा केली होती. त्यानंतर भरती होईल अशी आपेक्षा राज्यातील उमेदवारांना होती. मात्र केसरकर केवळ प्रसार माध्यमांसमोर भरती केली जाईल. पाच वर्षात कोणी भरती प्रक्रिया राबविली नाही. ती आम्ही राबविली असे ताण मानेने सांगतात. प्रत्यक्षात मात्र एकाही शिक्षकाला अद्याप नोकरी मिळालेली नाही. त्यामुळे मंत्र्यांनी आता भरतीचे गाजर दाखविणे बंद करावे आणि शिक्षक भरती करुन दाखवावी, असे आवाहन केसरकर यांच्यासह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना उमेदवारांनी केले आहे.

अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी होऊन दहा महिने उलटली तरीही पवित्र पोर्टलवर शिक्षक भरतीच्या जाहिराती आल्या नाहीत.त्यामुळे अनेक उमेदवार नैराशात आहेत.शिक्षण मंत्री दीपक केसरकर वारंवार 30000 आणि 50000 शिक्षक भरतीच्या घोषणा करतात परंतु त्या घोषणा हवेतच आहेत.मागील अधिवेशनात शिक्षण मंत्र्यांनी घोषणा केल्याप्रमाणे 80 टक्के पद भरतीच्या पहिली ते बारावी पर्यंतच्या जाहिराती एकाच टप्प्यात पवित्र पोर्टलवर अधिवेशन सुरू होण्यापूर्वी देण्यात याव्यात अन्यथा विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनावर सर्व अभियोग्यता धारकांना सोबत घेऊन मोर्चा काढण्यात येईल.

 - सुरेश सावळे, सहसचिव, स्पर्धा परीक्षा समन्वय समिती महाराष्ट्र राज्य

गेल्या सहा वर्षापासून आम्ही शिक्षक भरतीची आतुरतेने वाट पाहत आहोत. परीक्षा देऊन आम्ही गुणवत्ताही सिद्ध केली आहे. मात्र शिक्षक भरतीसाठी राज्य शासनाकडून चालढकल करण्यात येत आहे. विनाकारण रोज नविनवी परिपत्रके काढून गुणवत्तेला डावले जात आहे.आयुष्याच्या रोजी रोटीचा प्रश्न निर्माण झाला आहे. तरी शासनाला विनंती गुणवत्तेनुसार शिक्षक भरती करावी.

   -  कविता पाटील, अभियोग्यताधारक

अभियोग्यताधारकांनी विविध जिल्ह्यांत तब्बल १५ वेळा केली आंदोलने ...

राज्यात शिक्षक भरती सुरु करण्याच्या मागणीसाठी विविध जिल्ह्याक १५ वेळा आंदोलने करण्यात आली आहेत. तसेच सध्या पुण्यात पुण्यात शिक्षण आयुक्तालयापुढे उपोषण सुरू आहे. मुंबईतही आंदोलने करण्यात आली आहेत. परंतून सरकारने आश्वासनाशिवाय काहीच दिलेले नाही. त्यात एका महिला उमेदवाराने शिक्षणमंत्र्यांना भरतीबाबत विचारणा करताच त्यांनी तिला भरतीमध्ये अपात्र करण्याचा दम दिल्याने संतापाचे वातावरण दिसून येत आहे. आता हाच मुद्दा येत्या हिवाळी अधिवेशनात तापणार असल्याती चर्चा रंगली आहे.

शिक्षणमंत्र्यांचा घोषणांचा पाऊस..

२०२२च्या अधिवेशनात शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी यू-डायसनुसार राज्यात शिक्षकांची ६५ हजार १११ आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची २६४४ पदे रिक्त असल्याची माहिती दिली. तसेच यातील ८० टक्के पदे एकाच टप्प्यात भरण्याची घोषणा केली होती. यावेळी सादर केलेल्या रोडमॅपनुसार ही पदे नोव्हेंबर २०२३ पर्यंत भरणे अपेक्षित होते. मात्र, आता ७ डिसेंबरपासून हिवाळी अधिवेशन तोंडावर आलेले असतानाही एकही पद भरण्यात आलेले नाही.

शिक्षक भरतीचा प्रवास असा आहे सुरु...

जुलै २०२२ : औरंगाबाद खंडपीठात सुमोटो याचिका. राज्य शासनाने २०२२च्या द्वितीय सत्रापूर्वी शिक्षक भरतीचा रोडमॅप कोर्टात सादर

हा रोडमॅप पाळता न आल्याने नवा रोडमॅप सादर करून जून २०२३ पूर्वी भरती करण्याचे जाहीर

३१ जानेवारी २०२३ : शिक्षक भरतीसाठी अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता परीक्षेचे परिपत्रक

२२ फेब्रुवारी : अभियोग्यता परीक्षेला सुरुवात झाली. ही परीक्षा २ मार्चपर्यंत घेण्यात आली.

२४ मार्च: अभियोग्यता परीक्षेचा निकाल जाहीर.

शिक्षणमंत्र्यांनी पुन्हा तिसऱ्यांदा रोडमॅप जाहीर करत १५ जूनपूर्वी शिक्षक देण्याचे आश्वासित केले.

१७ एप्रिल : उच्च न्यायालयाकडून भरतीचे वेळापत्रक जाहीर करण्याचे निर्देश

त्यानंतर सरकारकडून २० ऑगस्टपर्यंत भरती करण्याचे परिपत्रक जारी.

मात्र, या काळात संचमान्यता आणि बिंदूनामावलीची कारणे देत वेळ मारून नेली.

जुलै २०२३ : अभियोग्यताधारकांनी ४० दिवस शिक्षण आयुक्त कार्यालय व मुंबईच्या आझाद मैदानात आंदोलन केले.

यानंतर मंत्र्यांनी १५ दिवसांत भरतीची घोषणा केली; पण बिदूनामावलीचे कारण देत भरती टाळली.

सप्टेंबर २०२३ : एका अभियोग्यताधारकाने मंत्रालयावरून उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न केला. त्यानंतर उमेदवारांकडून फक्त 'स्वप्रमाणपत्र' भरून घेण्यात आले.

ऑक्टोबर २०२३ : शिक्षणमंत्र्यांनी तीन-चार वेळा

माध्यमांसमोर येऊन ३० हजार शिक्षक भरती केल्याचे विधान केले.

नोव्हेंबर २०२३ : आजच्या तारखेपर्यंत अजून एकाही उमेदवाराला नियुक्ती मिळालेली साधी जाहिरातही आलेली नाही.

२६ नोव्हेंबर रोजी मंत्री दीपक केसरकर यांनी एका महिलेला अपात्र करण्याचा दम दिला.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest