रणसंग्राम २०२४: भाजपमध्ये कहीं खुशी... कहीं गम; उमेदवारांची पहिली यादी जाहीर, अनेक विद्यमान खासदार, मोठ्या नेत्यांना डच्चू!

लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election 2024) पार्श्वभूमीवर शनिवारी भाजपने आपल्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. या यादीमध्ये अनेक विद्यमान खासदारांना आणि पक्षाच्या मोठ्या नेत्यांना डच्चू दिल्याचे समोर आले होते.

BJP First Candidate List

संग्रहित छायाचित्र

नाराजीचे सूर अन् राजकारण संन्यास घेतल्याची घोषणा, दिग्गजांना बाहेरचा रस्ता, नव्या दमाच्या कार्यकर्त्यांना संधी

लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election 2024) पार्श्वभूमीवर शनिवारी भाजपने आपल्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. या यादीमध्ये अनेक विद्यमान खासदारांना आणि पक्षाच्या मोठ्या नेत्यांना डच्चू दिल्याचे समोर आले होते. त्यामुळे भाजपमध्ये (BJP) 'कहीं खुशी... कहीं गम' असे वातावरण बघायला मिळत आहे. पक्षात सन्मानाने मिळवलेल्या, मंत्रिपदे आणि संघटनेत मानाची पदे भूषविलेल्या अनेक दिग्गजांना पक्षाने आता मार्गदर्शक मंडळात पाठवण्याचा निर्णय घेतला असून त्यांच्या जागी सर्व समाजघटकातील नव्या दमाच्या युवा कार्यकर्त्यांना संधी देण्याचा निर्णय घेतला आहे.

गौतम गंभीर (Gautam Gambhir) आणि जयंत सिन्हा (Jayant Sinha) यांच्यानंतर दिल्लीतील वरिष्ठ नेते डॉ. हर्षवर्धन यांनीही राजकारणातून संन्यास घेण्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत. शनिवारी भाजपने जाहीर केलेल्या यादीतून हर्षवर्धन यांचे नाव वगळण्यात आले होते. हर्षवर्धन यांच्याऐवजी पक्षाने प्रवीण खंडेलवाल यांना उमेदवारी देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानंतर डॉ. हर्षवर्धन यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर एक दीर्घ पोस्ट लिहिली आहे. त्यामध्ये त्यांनी त्यांचा राजकीय प्रवास सांगितला आहे.

तीस वर्षांपेक्षा जास्तीच्या राजकारणात मी पाच विधानसभा निवडणुका आणि दोन लोकसभा निवडणुका लढल्या.. ज्या मी अंतराने जिंकल्या. पक्ष, राज्य आणि केंद्र सरकारमध्ये महत्त्वाच्या पदांवर मला काम करता आले. 

''पन्नास वर्षांपूर्वी जेव्हा मी गरीब आणि गरजवंतांना मदत करण्याची प्रेरणा घेऊन मेडिकल कॉलेज, कानपूरमध्ये प्रवेश घेतला तेव्हा मानव जातीची सेवा, हाच माझा विचार होता. रांगेत उभ्या असलेल्या शेवटच्या माणसापर्यंत लाभ पोहोचावा, यासाठी मी प्रयत्न करीत राहिलो. तत्कालीन आरएसएस नेतृत्वाच्या आग्रहावरून मी निवडणुकीच्या मैदानात उतरलो. त्याचे कारण गरिबी, आरोग्य आणि अज्ञान या विरोधात लढण्याचा माझा प्रयत्न. मला काही आश्वासने पूर्ण करायची आहेत.. काही मैल चालायचे आहे. 

माझे एक स्वप्न आहे आणि मला माहिती आहे की जनतेचा आशीर्वाद सदैव माझ्यासोबत राहील. शिवाय कृष्णानगरमध्ये असलेले माझे ईएनटी क्लिनिक माझ्या परतीची वाट बघत आहे, अशी पोस्ट माजी केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी केली आहे.

'या' मंत्र्यांना पहिल्या यादीत तिकीट नाही

नितीन गडकरी, नारायण राणे, रावसाहेब दानवे, भागवत कराड, भारती पवार, अनुराग ठाकूर, निर्मला सीतारामण, एस. जयशंकर, पियूष गोयल, अश्विनी वैष्णव, धर्मेंद्र प्रधान, प्रल्हाद जोशी, गिरीराज सिंह, राजकुमार सिंह, हरदीप सिंग पुरी, राव इंद्रजित सिंह, अश्विनी चौबे, व्ही. के. सिंह, कृष्णपाल, नित्यानंद राय, एस. पी. सिंह बघेल, शोभा करंदलाजे, दर्शना जरदोष, मीनाक्षी लेखी, सोम प्रकाश, रामेश्वर तेली,अन्नपूर्णा देवी, ए. नारायणस्वामी, अजय भट्ट भगवंत खुबा, कपिल पाटील, प्रतिमा भौमिक, सुभाष सरकार, राजकुमार रंजन सिंह, बिश्वेश्वर तोडू, एम. महेंद्रभाई, जॉन बार्ला, एल. मुरुगन

या चार वादग्रस्त खासदारांना डच्चू

साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर

भाजपाने मध्य प्रदेशच्या भोपाळ मतदारसंघातून साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांच्या ऐवजी अलोक वर्मा यांना संधी दिली आहे. साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी कॉंग्रेसच्या दिग्विजय सिंह यांचा ३६४८२२ मतांनी पराभव केला होता. परंतू प्रज्ञा सिंग ठाकूर यांनी २६/११ मुंबईवरील हल्ल्यातील शहीद अशोक चक्र विजेते दहशतवाद विरोधी पथकाचे प्रमुख हेमंत करकरे यांची तुलना रावण आणि कंसा यांच्या बरोबर केल्याने त्या वादग्रस्त ठरल्या होत्या. त्यानंतर नथुराम गोडसे देशभक्त म्हटल्याने त्या पुन्हा वादग्रस्त ठरल्या.

रमेश बिधुरी

रमेश बिधुरी यांनी संसदेत भाषण करताना खासदार दानिश अली यांच्या विरोधात अश्लाघ्य भाषेत टीका केल्याने ते वादग्रस्त ठरले होते. त्यानंतर भाजपा अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी बिधुरी यांना नोटीस बजावली होती. चांद्रयान मोहिमेबद्दल चर्चा सुरू असताना रमेश बिधुरी यांनी दानिश अली यांच्यावर अपमानजनक भाषा वापरीत टीका केली होती.

परवेश वर्मा

पश्चिम दिल्लीचे खासदार परवेश वर्मा यांचे नाव वगळून त्यांच्या जागी यंदा कमलजीत शेरावत यांना तिकीट मिळाले आहे. परवेश वर्मा यांनी गेल्या वर्षी ९ ऑक्टोबर रोजी विराट हिंदू संमेलनात एका विशिष्ट धर्मसमुदायावर बायकॉट करा असे वादग्रस्त विधान केले होते. त्यामुळे त्यांच्या जागी पहिल्या यादीत साऊथ दिल्ली म्युनिसिपल कॉर्पोरेशनचे माजी महापौर कमलजीत शेरावत यांना संधी देण्यात आली आहे.

जयंत सिन्हा

हजारीबाग लोकसभा मतदारसंघातून यंदा जयंत सिन्हा यांच्या जागी आमदार मनीष जयस्वाल यांना तिकीट मिळाले आहे. माजी केंद्रीय मंत्री यशवंत सिन्हा यांचे पुत्र असलेले जयंत सिन्हा यांनी साल २०१७  झारखंड येथील रामगड येथे एका मटण विक्रेत्याला मारहाण केल्या प्रकरणातील आरोपींच्या वकिलांची फी जयंत सिन्हा यांनी भरली होती. या सहा आरोपींचा त्यांनी त्यांच्या हजारीबाग येथील निवासस्थानी सत्कार केल्याने ते वादात सापडले.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest