Politics : मध्य प्रदेशात लाडली योजना, मामाजींचे नेतृत्वामुळे निवडणुकीत यश - सुप्रिया सुळे

मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड या तीन राज्यात भारतीय जनता पक्षाला स्पष्ट बहुमत मिळाले. त्यावर राष्ट्रवादीच्या कार्याध्यक्षा आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी मध्य प्रदेशात लाडली योजना, मामाजींचे नेतृत्वामुळे निवडणुकीत यश मिळाल्याचे सांगितले.

Politics : मध्य प्रदेशात लाडली योजना, मामाजींचे नेतृत्वामुळे निवडणुकीत यश -  सुप्रिया सुळे

संग्रहित छायाचित्र

पुणे : मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड या तीन राज्यात भारतीय जनता पक्षाला स्पष्ट बहुमत मिळाले. त्यावर राष्ट्रवादीच्या कार्याध्यक्षा आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी मध्य प्रदेशात लाडली योजना, मामाजींचे नेतृत्वामुळे निवडणुकीत यश मिळाल्याचे सांगितले. तर राजस्थान राज्याबाबत सध्या काही सांगता येणार नाही. असे सांगून या निकालांमुळे पुढील निडणूकांवर म्हणजेच लोकसभेच्या निवडणूकीवर कोणताही परिमाण होणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

कोथरुड येथील यशवंतराव चव्हाण सेंटरतर्फे आयोजित गावरान खाद्य महोत्सवाला सुप्रिया सुळे यांनी भेट दिली. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. सुळे म्हणाल्या की, ''मध्य प्रदेश राज्यात ''लाडली योजने''ची चांगलीच चर्चा होती. तसेच मध्य प्रदेशच्या निवडणुकीत मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान मामाजी यांचे नेतृत्व महत्त्वाचे होते. तेलंगणामध्ये रेवंत रेड्डी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसला मोठे यश मिळाले. '' राजस्थानबाबत अजून काही सांगता येणार नसल्याचेही सुप्रिया सुळे यांनी यावेळी निकालांबाबत स्पष्ट केले.

पाच वर्षांपूर्वी मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये काँग्रेसने बाजी मारली होती. भाजपचा पराभव झाला. त्यानंतर लोकसभा निवडणुकीत चित्र वेगळे होते. भाजपच्या विजयाचे कोणतेही ठोस कारण सांगता येणार नाही. तसेच राजस्थान आणि मध्य प्रदेशात भाजपने विजय मिळवला असला तरी येत्या निवडणुकीत त्याचा परिणाम होणार नसल्याचे सुप्रिया सुळे यांनी ठामपणे सांगितले.

काँग्रेसच्या रेवांत रेड्डी यांनी ज्या प्रकारे आघाडी घेतली त्यावरून त्यांचे नेतृत्व तेलंगणासाठी उपयुक्त ठरले. बीआरएसचे केसीआर यांनीही तेलंगणामध्ये चांगल्या योजना राबविल्या होत्या. मात्र तेथे त्यांना अपेक्षित यश मिळाले नाही तर मध्यप्रदेशात योजनेचा परिणाम झाला.  राजस्थानमधील भाजपच्या विजयाबाबत विश्लेषण करावे लागले. असेही त्या म्हणाल्या.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest