दहा महिन्यांत १० मिनिटे मिळाली नाहीत; पोहरादेवीच्या सुनील महाराजांची खंत, ऐन निवडणुकीत उद्धव ठाकरेंचा पक्ष सोडला

मुंबई : कार्यकर्त्यांच्या बळावर पक्ष जगत असतो. पक्षाच्या प्रमुखाला कार्यकर्ते जपता येत नसतील तर असा पक्ष वाढत नसतो. दहा महिन्यांत उद्धव ठाकरेंना मला १० मिनिटांची वेळ देता आलेली नाही.

Civic Mirror, सीविक मिरर, Pune Mirror, Pune Times Mirror, Pune, Pune News

संग्रहित छायाचित्र

मुंबई : कार्यकर्त्यांच्या बळावर पक्ष जगत असतो. पक्षाच्या प्रमुखाला कार्यकर्ते जपता येत नसतील तर असा पक्ष वाढत नसतो. दहा महिन्यांत उद्धव ठाकरेंना मला १० मिनिटांची वेळ देता आलेली नाही. पक्षात माझी गरज नसेल, ठाकरेंना मला भेटणे शक्य नसेल तर अशा पक्षात माझे काय काम, असा सवाल करत पोहरादेवीचे (Pohradevi) महंत सुनील महाराज  यांनी शिवसेना ठाकरे गटाला सोडचिठ्ठी दिली आहे.  

विधानसभेची निवडणूक जाहीर झाली आहे. २२ ऑक्टोबरपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवातही झाली आहे. त्यामुळे राज्याच्या राजकारणात घडामोडींना वेग आला आहे. यातच अनेक नेते एका पक्षामधून दुसऱ्या पक्षात प्रवेश करत असल्याचेही पाहायला मिळत आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांचे नेते जोरदार कामाला लागले आहेत. या विधानसभा निवडणुकीत महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी मुख्य लढत होणार आहे. उमेदवारांना एबी फॉर्मही दिले जात आहेत. महाविकास आघाडीच्या उमेदवारांची यादीही लवकरच जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती सांगण्यात येत आहे. अशातच ऐन निवडणुकीत शिवसेना ठाकरे गटाला (Shiv Sena UBT) मोठा धक्का बसला आहे.

पोहरादेवीचे महंत सुनील महाराज ((Mahant Sunil Maharaj)) यांनी शिवसेना ठाकरे गटाला सोडचिठ्ठी दिली आहे. महंत सुनील महाराज यांनी ठाकरे गटाचा राजीनामा देताना आपली खंतही बोलून दाखवली. गेल्या १० महिन्यांत १० मिनिटेही उद्धव ठाकरेंचा वेळ मिळाला नाही. त्यामुळे उद्धव ठाकरे वेळ देत नसल्यामुळे मी पक्षातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला असल्याचे सुनील महाराज यांनी सांगितले आहे. मी अनेकवेळा उद्धव ठाकरे यांना भ्रमणध्वनीद्वारे संपर्क साधला, मेसेजही केले. पक्ष वाढीसाठी आणि समाजाच्या हितासाठी मला तुम्हाला भेटायचे आहे, असे म्हणत उद्धव ठाकरे यांचे पीए रवी म्हात्रे यांनाही अनेकवेळा संपर्क केला. त्यांच्याकडे उद्धव ठाकरे यांच्या भेटीची वेळ मागितली. मात्र, गेल्या जवळपास १० ते १२ महिन्यांपासून मला त्यांच्या भेटीचा साधा १० मिनिटेही वेळ मिळाला नाही. मग आपण भेटीची वेळ मागून जर भेट मिळत नसेल, आपली दखल घेतली जात नसेल तर पक्षाला आपली गरज नाही हे सिद्ध होते, असे सुनील महाराज म्हणाले आहेत.

दरम्यान, वर्षभरापूर्वी ‘मातोश्री’वर जाऊन पोहरादेवी येथील महंत सुनील महाराज यांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या हस्ते शिवबंधन बांधले होते. मात्र, आता सुनील महाराज यांनी आपली नाराजी व्यक्त करणारे एक पत्रही उद्धव ठाकरे यांना लिहिले आहे. या पत्रात आपण मोठ्या जड अंत:करणाने शिवसेना (ठाकरे) पक्षाचा राजीनामा पत्राद्वारे देत असल्याचे त्यांनी नमूद केले आहे. 
 

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest