Namdev Jadhav : नामदेव जाधव यांना काळे फासल्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार(Sharad Pawar) (NCP) यांच्यावर टीका केल्याने प्रसिद्ध वक्ते प्रा. नामदेव जाधव (Namdev Jadhav) यांच्यावर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी हल्ला करत त्यांच्या तोंडाला काळे फासले होते.

Namdev Jadhav

पुणे: राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार(Sharad Pawar) (NCP) यांच्यावर टीका केल्याने प्रसिद्ध वक्ते प्रा. नामदेव जाधव (Namdev Jadhav) यांच्यावर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी हल्ला करत त्यांच्या तोंडाला काळे फासले होते. याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेच्या कार्यकर्त्यांवर विश्रामबाग पोलीस (Vishrambagh Police) ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

भांडाकर इन्स्टीट्युट येथील नियोजित कार्यक्रम रद्द का करण्यात आला, याची माहिती देण्यासाठी जाधव नवी पेठेतील पत्रकार भवन येथे आले असता १० ते १५ कार्यकर्त्यांनी जाधव यांच्यावर अचानक हल्ला केला होता. तसेच राष्ट्रवादीचे शरद पवार यांच्या विरोधात भुमिका घ्याल तर या जगात दिसणार नाहीत. अशी धमकी देवून त्यांच्या तोंडाला अंगाला काळी शाई फासली होती. तसेच जाधव यांचे अंगरक्षक अक्षय कांबळे हे त्यांचे कर्तव्य बजावत असताना त्यांना देखील धक्काबुक्की केली. त्यांच्या सरकारी कामात अडथळा आणला. ही घटना शनिवारी सायंकाळी घडली. याबाबत जाधव यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यांच्या तक्रारीनुसार राष्ट्रवादी काँग्रेसच्या १० ते १५ कार्यकर्त्यांवर सरकारी कामात अडथळा आणणे; तसेच धक्काबुक्की केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार, जाधव यांचे भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिरात शनिवारी (१८ नोव्हेंबर) दुपारी व्याख्यान आयोजित केले होते. मात्र, सुरक्षिततेच्या कारणावरून पोलिसांनी त्यांना परवानगी नाकारली होती. यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधण्यासाठी जाधव सायंकाळी सहाच्या सुमारास नवी पेठेतील पत्रकार भवन येथे आले. तेथे ते पत्रकारांशी बोलत होते. त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते तेथे आले. कार्यकर्त्यांनी जाधव यांना धक्काबुक्की करून काळे फासले. जाधवांना काळे फासण्यात पवार गटाच्या महिला कार्यकर्त्यांचाही समावेश होता. या घटनेनंतर तेथे गोंधळ उडाला. त्यावेळी तेथे असलेल्या पोलिसांनी सुरक्षाकडे करून जाधव यांना कारमध्ये बसवले. तेथून जाधव विश्रामबाग पोलीस ठाण्यात गेले. जाधव यांनी तक्रार नोंदवली. जाधव यांच्या बरोबर असलेला पोलीस कर्मचाऱ्याला धक्काबुक्की करून गणवेशावर शाई फेकण्यात आली.  पोलीस उपनिरीक्षक फरताडे तपास करत आहेत.

 नामदेव जाधव हे शरद पवार यांच्यावर खोटे नाटे आरोप करत असल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची ही उत्स्फूर्त प्रतिक्रिया आहे असे पक्षाचे प्रवक्ते अंकुश काकडे यांनी सांगितले. जाधव यांनी आपले वर्तन सुधारले नाही तर त्यांना पुण्यातच काय राज्यातही फिरू देणार नाही असा इशारा काकडे यांनी दिला आहे. 

शरद पवार मुख्यमंत्री असताना मराठ्यांचा ओबीसी प्रवर्गात समावेश न करता इतर समुदायांचा ओबीसीत समावेश करण्याचा अध्यादेश काढला होता. तयामुळे मराठ्यांचे नुकसान झाले. शरद पवार हे मराठा नसून ओबीसी आहेत, असा आरोप जाधव करत आहेत. यावरुन संतापलेल्या शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्यावर हल्ला करत तोंडाला काळे फासले.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest