संग्रहित छायाचित्र
नवी दिल्ली: उद्योगपती गौतम अदानी यांना अमेरिकेने बजावलेली नोटीस, पंतप्रधान मोदी आणि भाजपचे अदानी यांच्यासोबत असणारे संबंध या मुद्यांवरून सरकारवर आक्रमकपणे हल्ला चढवणारी काँग्रेस गुरुवारी (दि.१२) संसदेत बचावात्मक पवित्रा घेताना दिसली. भाजपचे खासदार निशिकांत दुबे यांनी राहूल गांधी आणि काँग्रेसला धारेवर धरताना जोरदार प्रतिहल्ला चढवला. राजीव गांधी फाउंडेशन आणि जॉर्ज सोरोस यांच्यात काय संबंध आहेत, जॉर्ज सोरोस आणि सोनिया गांधी यांच्यात काय संबंध आहेत, या आणि अशा अनेक प्रश्नांची सरबत्ती करत दुबे यांनी काँग्रेसला बॅकफूटवर जाण्यास भाग पाडले.
डेमोक्रॅटिक लीडर्स इन एशिया पॅसिफिक फाउंडेशन (एफडीएल- एपी) काश्मीरला स्वतंत्र मानते. सोनिया गांधी यासंस्थेच्या सह-अध्यक्ष आहेत. या संस्थेसोबत राजीव गांधी फाउंडेशन आणि सोनिया गांधी यांचे काय संबंध आहेत. सोनिया गांधी आणि जॉर्ज सोरोस यांच्यात काय संबंध आहेत नाम्बियार समितीच्या अहवालानुसार ओव्हरसीज कमिटी ऑफ काँग्रेसचे अध्यक्ष सॅम पित्रोदा यांनी १५० कोटींचा घोटाळा केला आहे. हेच पित्रोदा ग्लोबल नॉलेज इनिशिएटिव्ह हा उपक्रम राबवतात. या उपक्रमासाठी म्हणून जॉर्ज सोरोस पित्रोदा यांना पैसा पुरवत असते. राहुल गांधी यांच्या प्रदेशवाऱ्यांचा खर्च ग्लोबल नॉलेज इनिशिएटिव्ह करत असते. ग्लोबल नॉलेज इनिशिएटिव्ह खलिस्तानी संस्थांशी जोडले गेले आहे. जॉर्ज सोरोस गांधी परिवारातील व्यक्तींचा खर्च का उचलते? खलिस्तानी, काश्मीरमधील विघटनवाद्यांचा खर्च जॉर्ज सोरोस कशासाठी करतो ? अशा प्रश्नांची सरबत्ती करत दुबे यांनी संसदेत काँग्रेसची कोंडी केली.
राजीव गांधी फाऊंडेशनला सर्वाधिक आर्थिक रसद जॉर्ज सोरोसकडून दिली जाते. जॉर्ज सोरोस हा मनोज भार्गव हर्ष फौंडेशनसोबत काळा पैसा व्हाईट करून घेतो. वेगवेगळ्या नावांचे फंड तयार करून सोरोसने काँग्रेसला पैसा पुरवला आहे. काँग्रेसच्या ३०० लोकांना स्टार्ट आपच्या नावाखाली सोरोसने पैसे दिले आहेत. राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेचा खर्च जॉर्ज सोरोस यानेच केलेला आहे. हे सगळे कसे घडून आले याचे त्तर सोनिया आणि राहुल गांधी यांनी देशाला द्यावे, असे आवाहनही दुबे यांनी आज सभागृहात बोलताना केले आहे.
काँग्रेसचा देशविघातक संस्थांशी घरोबा
खलिस्तानी चळवळीशी काँग्रेसचा संबंध असतो. देशविघातक कारवायात सहभागी असणाऱ्या डेमोक्रॅटिक लीडर्स इन एशिया पॅसिफिक फाउंडेशनशी गांधी घराण्याचे जवळचे संबंध असतात. शब्बीर शाह हा विघटनवादी खासदार जॉर्ज सोरोसकडून लष्कर ए तोयबासाठी निधी घेतो. त्या दोघांशीही सोनिया गांधी यांचे संबंध असतात. प्रत्येक देशविघातक व्यक्ती आणि संस्था गांधी यांच्याशी संबंधित कशा असतात? असा सवालही भाजप खासदारांनी सभागृहात उपस्थित केला.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.