संग्रहित छायाचित्र
बंगळुरू : गुन्हे मागे घेण्यासाठी न्यायाधीशाने तीन कोटींची मागणी, पोटच्या मुलाला भेटण्याकरता ३० लाखांची अतिरिक्त मागणी, कुटुंबाला खोट्या गुन्हात अडवण्याची भीती घालत वेळोवेळी पैशाच्या मागणी करीत २० लाख रुपये लुबाडल्याचा आरोप करीत बंगळुरूतील एका तरूण आर्टिफिशियल इंटेलेजन्स इंजिनिअर असलेल्या अतुल सुभाष (वय ३४) यांने १ तास २० मिनिटाचा व्हिडिओ प्रसारित करीत व सुसाईड नोट मागे ठेवत आत्महत्या केली.
या तरुणाचा आत्महत्या केल्याचा व्हिडिओ समोर येताच सोशल मीडियावर अविश्वनीय आणि चकित करणाऱ्या प्रतिक्रियांचा पाऊस पडत आहे. या व्हिडिओमध्ये त्याने पत्नी आणि सासरच्यांवर अनेकविध आरोप केले आहेत. त्याच्यावर खोटे गुन्हे दाखल करून त्याच्यासह त्याच्या आईवडिलांना कसा त्रास दिला याची सविस्तर माहिती त्याने व्हिडिओद्वारे दिली आहे.
अतुलने आपल्या ४ वर्षांच्या मुलासाठी पत्र आणि गिफ्ट ठेवले. २०३८ मध्ये पत्र उघडण्यास सांगितले. मृत्यूसाठी जबाबदार लोक व कारणांची माहिती दिली. तसेच अंतिम इच्छादेखील व्यक्त केली. यूपीच्या राहणाऱ्या सुभाषने कौटुंबिक वाद व कायदेशीर लढ्यामुळे होणाऱ्या मानसिक छळाच्या वेदना मांडल्या. पत्नी निकिता सिंघानिया, सासू, साळा व चुलत सासऱ्यांना मृत्यूस जबाबदार म्हटले. पोलिसांना सुभाषच्या मृतदेहाजवळ बोर्ड दिसला. त्यावर लिहिले, न्याय बाकी आहे. नोटमध्ये सुभाषने न्यायव्यवस्थेवरही प्रश्न उपस्थित केले.
प्रकरण मिटविण्यासाठी न्यायाधिशाने मागितले ३ कोटी
याच्याामागे पाच माणसं आहेत. प्रिसिंपल फॅमिली कोर्ट न्यायाधीश नीता कौशिक, माझी पत्नी निकिता सिंघानिया, माझी सासू निशा सिंघानिया, मेव्हणा अनुराग सिंघानिया, माझे पत्नीचे काका हे याला कारणीभूत आहेत. असे म्हटले आहे. न्यायमूर्तींनी तीन कोटी रुपयांत प्रकरण मिटवण्यासाठी दबाव टाकला. मला ५ लाख मागितले. प्रत्येक पेशीला लाच द्यावी लागे. तडजोडीस नकार दिल्याने न्यायाधीशांनी बाजू मांडण्याची संधी न देता पत्नीला दरमहा ८० हजार रुपये देण्याचे आदेश दिले.
निर्दोष मुक्त झाल्यास अस्थिकलश कोर्टाबाहेरील गटारात फेका
माझ्या खटल्याच्या सुनावणीचे थेट प्रक्षेपण करा. पत्नीने माझ्या मृतदेहाला हात लावू नये. माझ्यावर अत्याचार करणाऱ्यांना शिक्षा झाल्याशिवाय अस्थिकलशाचे विसर्जन करू नये. जर न्यायालयाने भ्रष्ट न्यायाधीश, पत्नी व तिच्या कुटुंबीयांची निर्दोष मुक्तता केल्यास माझा अस्थिकलश त्याच कोर्टाबाहेरील गटारात फेकून द्यावा. माझ्या मुलाचा ताबा माझ्या पालकांकडे द्यावा.
पतीपासून बदला घेण्यासाठी शस्त्र म्हणून कायद्याचा वापर
वैवाहिक मतभेदांतून उद्भवणाऱ्या घरगुती वादांत पती व त्याच्या घरच्यांना आयपीसी कलम ४९८-अ अंतर्गत फसवण्याच्या वाढत्या प्रवृत्तीवर सुप्रीम कोर्टाने गंभीर चिंता व्यक्त केली. न्या. बी. व्ही. नागरत्ना व न्या. एन. कोटीश्वर सिंह यांचे खंडपीठ मंगळवारी असाच एक खटला फेटाळताना म्हणाले, कलम ४९८-अ हे पत्नी व तिच्या कुटुंबासाठी हिशेब चुकता करण्याचे शस्त्र बनले.
काय काय आहे त्या व्हिडिओमध्ये
मी अतुल सुभाष, सॉफ्टवेअर कंपनीत आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) विंगमध्ये डीजीएम आहे. २०१९ मध्ये निकितासोबत लग्न झाले. तीसुद्धा एआय कन्सलटंट आहे. मात्र, लग्नानंतर ती व तिचे कुटुंबीय माझ्याकडे कोणत्या ना कोणत्या बहाण्याने पैसे मागत राहिले. सुरुवातीला मी देत होतो. ते माझा वापर करून घेत असल्याचे जाणवल्यानंतर मी नकार देऊ लागलो. यानंतर निकिता व तिच्या कुटुंबीयांनी माझ्यावर आणि माझ्या कुटुंबावर कौटुंबिक हिंसाचार, खून, हुंड्यासाठी छळ असे नऊ गुन्हे दाखल केले. त्यांच्या सुनावणीसाठी १२० तारखा केल्या. एका वर्षात २३ सुट्ट्या मिळतात. पण मला ४० वेळा जौनपूरला जावे लागले. मी हे कसे हाताळले ते तुम्ही समजू शकता. न्यायमूर्तींनी तीन कोटी रुपयांत प्रकरण मिटवण्यासाठी दबाव टाकला. मला ५ लाख मागितले. प्रत्येक तारखेला लाच द्यावी लागे. तडजोडीस नकार दिल्याने न्यायाधीशांनी बाजू मांडण्याची संधी न देता पत्नीला दरमहा ८० हजार रुपये देण्याचे आदेश दिले.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.