महिलेने मागवला ब्रश, िमळाला चाट मसाला
#नवी दिल्ली
ऑनलाईन खरेदी हा मटका असल्याचे बोलले जाते. कारण आपण मागवलेली वस्तूच आपल्या अपेक्षेप्रमाणे आपल्या मिळेल, याची शाश्वती देता येत नाही. त्यामुळे अनेक लोक पुन्हा प्रत्यक्ष खरेदीकडे वळतात. काहीजणांना याबाबत चांगले अनुभव आले आहेत, मात्र सगळेच याबाबत नशीबवान नसतात. असाच एक प्रकार समोर आला आहे. सध्या एक व्हीडीओ समोर आला असून एका महिलेने चक्क १२ हजार रुपयांची वस्तू मागितली होती पण तिची फसवणूक झाली आहे.
आपण कधी ऑनलाईन पद्धतीने एखादी वस्तू ऑर्डर केली आहे का? केली असेल तर कधी आपली फसवणूक झाली का? ऑनलाईन वस्तू ऑर्डर केल्यानंतर अनेकजणांची फसवणूक झाल्याचे आपण ऐकले असेल. त्यामुळे लोक उन्हा एकदा परंपरागत खरेदीकडे वळण्याची शक्यता आहे. एका महिलेने चक्क १२ हजार रुपयांचा ओरल-बी या कंपनीचा इलेक्ट्रिक टूथब्रश मागवला होता, पण ज्यावेळी ते पार्सल घरी आले, त्यावेळी पार्सलमध्ये चाट मसाला आढळून आला आहे. त्यानंतर या महिलेच्या मुलीने हा प्रकार सोशल मीडियावर शेअर केला आहे.
प्रिय अमेझॉन, तुम्ही एक वर्षभरापासून खरेदीदारांची फसवणूक करणाऱ्या विक्रेत्याला का काढले नाही ? माझ्या आईने १२ हजार किमतीचा ओरल-बी इलेक्ट्रिक टूथब्रश ऑर्डर केला, पण त्याऐवजी मला चाट मसाल्याचे चार बॉक्स मिळाले आहेत. विक्रेता 'एमईपीएलईडी'ने जानेवारी २०२२ पासून डझनभर ग्राहकांची अशी फसवणूक केली आहे, असे या तरुणीने आपल्या ट्वीटमध्ये लिहिले आहे. त्याचबरोबर तिने या प्रकाराचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.