लग्झरी गाडीत कुंड्या चोरीत...

जी-२० शिखर परिषदेसाठी लावण्यात आलेलया कुंड्या चोरीप्रकरणी गुरुग्राम पोलिसांनी एका व्यक्तीला अटक केली आहे. गुरुग्राम पोलिसांनी मनमोहनला अटक केली असून कारमधून चोरीच्या कुंड्या जप्त केल्या आहेत.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Super Admin
  • Thu, 2 Mar 2023
  • 06:01 pm
लग्झरी गाडीत कुंड्या चोरीत...

लग्झरी गाडीत कुंड्या चोरीत...

#गुरुग्राम

जी-२० शिखर परिषदेसाठी लावण्यात आलेलया कुंड्या चोरीप्रकरणी गुरुग्राम पोलिसांनी एका व्यक्तीला अटक केली आहे. गुरुग्राम पोलिसांनी मनमोहनला अटक केली असून कारमधून चोरीच्या कुंड्या जप्त केल्या आहेत.

कार हरियाणातील हिस्सार येथून नोंदणीकृत असून आरोपी गुरुग्रामचा रहिवासी आहे. चोरट्यांच्या लक्झरी कारचा नंबरही व्हीआयपी आहे. चोरीचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर जीएमडीएने पोलिसांत तक्रार दिली होती.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला हा व्हीडीओ गुरुग्राममधील शंकर चौकातील आहे. व्हीडीओमध्ये एक गाडी येऊन थांबल्याचे दिसते. दोन जण गाडीतून खाली उतरतात. चौकात सजावटीसाठी ठेवलेल्या विशिष्ट प्रकारच्या वनस्पतींच्या कुंड्या उचलून गाडीच्या डिक्कीत ठेवली जातात. गुरुग्रामच्या  अॅम्बियन्स मॉलमधील लीला हॉटेलमध्ये जी-20 परिषदेची तयारी बऱ्याच दिवसांपासून जोरात सुरू आहे. यामध्ये परदेशातून येणाऱ्या पाहुण्यांना इम्प्रेस करण्यासाठी शहर सजवले जात आहे. रस्त्यांच्या दुतर्फा असलेल्या फूटपाथवरही खास प्रकारची रोपे लावली जात आहेत. वृत्तसंंस्था

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest