बॉयफ्रेंडसोबत प्रामाणिक म्हणून नाकारला फ्लॅट

गुरुग्राममध्ये (गुडगाव) भाड्याने घर मिळवणे किती कठीण बनले आहे, याचा अंदाज या गोष्टीवरून येतो की, एका मुलीने दुसऱ्या मुलीसोबत एका फ्लॅटमध्ये राहण्यास नकार दिला. कारण तिला सीरियस रिलेशनशिप पसंद नव्हती. गुडगावमध्ये एका महिलेने लव्ह लाईफबद्दल प्रश्न विचारल्यावर वाद झाला. एक्स वापरकर्त्याने फेसबुक ग्रुप 'फ्लॅट अँड फ्लॅटमेट्स' वर एका महिलेशी झालेल्या संभाषणाचा स्क्रीनशॉट शेअर केला.

Civic Mirror, सीविक मिरर, Pune Mirror, Pune Times Mirror, Pune, Pune News

संग्रहित छायाचित्र

गुरुग्राम: गुरुग्राममध्ये (गुडगाव) भाड्याने घर मिळवणे किती कठीण बनले आहे, याचा अंदाज या गोष्टीवरून येतो की, एका मुलीने दुसऱ्या मुलीसोबत एका फ्लॅटमध्ये राहण्यास नकार दिला. कारण तिला सीरियस रिलेशनशिप पसंद नव्हती. गुडगावमध्ये एका महिलेने लव्ह लाईफबद्दल प्रश्न विचारल्यावर वाद झाला. एक्स वापरकर्त्याने फेसबुक ग्रुप 'फ्लॅट अँड फ्लॅटमेट्स' वर एका महिलेशी झालेल्या संभाषणाचा स्क्रीनशॉट शेअर केला.

या पोस्टमध्ये रेंटर महिलेला 'डेट'वर गेली आहेस आहे का, असा प्रश्न विचारताना दिसत आहे. या प्रश्नाने गोंधळलेल्या महिलेना घरात जाण्यासाठी तयार होण्याची तारीख विचारायची आहे का, हे स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला.  मी डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात किंवा जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात शिफ्ट होऊ शकते, असे तिने सांगितले. त्यानंतर रेंटरने स्पष्ट केले की, तिला बॉयफ्रेंड आहे का हे विचारायचे होते. त्यावर महिलेने सांगितले की, हो बॉयफ्रेंड आहे,  मात्र तो गुडगावबाहेर असल्याचे महिलेने सांगितले. महिलेने पुढचा प्रश्न केला की, बॉयफ्रेंडसोबत गंभीर आहेस का?, असे विचारल्यावर ती महिला हो असे उत्तर देते. त्यानंतर  रेंटर सांगते की ती कॅज्युअल रिलेशनशिपला प्राधान्य देते आणि फ्लॅटमेट ठेवण्यास प्राधान्य देते ज्याला देखील तितकीच पसंती आहे. दोघींमधील बातचीत पुढे सरकते, पहिली म्हणते तु बॉयफ्रेंडसोबत सीरियस आहेस का, दुसरी म्हणते हो. त्यावर समोरची मुलगी उत्तर देते की, तिला कॅज्युएल रिलेशनशिप पसंद आहे आणि असा फ्लॅटमेट पाहिजे ज्याची पसंतही तशीच आहे. त्यानंतर दोघींचे संभाषण बंद होते.

दोघींमधील संभाषणाचे चॅट सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. त्यावर अनेकांनी आपल्या प्रतिक्रिया पोस्ट केल्या आहेत. पोस्टच्या कमेंट्स बहुतेक हसण्याच्या इमोजींनी भरलेल्या होत्या, तर काही युजर्सनी महिलेला पर्याय देण्याचा प्रयत्न केला. रिजेक्ट होणाऱ्या मुलीने दुसऱ्या तरुणीसोबत व्हॉट्सएपवर झालेले संभाषण सोशल मीडिया प्लेफॉर्म एक्सवर टाकले आहे. मुलीच्या या पोस्टवर नेटीझन्स मोठ्या प्रमाणात कमेंट करत आहेत. एका यूजरने लिहिले की, हे भगवान या जगात काय काय होत आहे?

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest