केंद्राच्या जीएसटी संकलनात घट
#नवी दिल्ली
देशाच्या अर्थव्यवस्थेच्या सक्षमीकरणाचे दावे करणाऱ्या केंद्र सरकारसाठी एक नकारात्मक बातमी समोर आली आहे. नव्या वर्षातील फेब्रुवारी महिन्यात वस्तू व सेवा कराच्या (जीएसटी) माध्यमातून जमा झालेल्या महसुलाची आकडेवारी समोर आली असून फेब्रुवारीत केंद्र सरकारकडे १.४९ लाख कोटीं रुपयांचा जीएसटी जमा हाला आहे. विशेष म्हणजे जानेवारीच्या तुलनेत ही रक्कम ८ लाख कोटींनी कमी भरते. केंद्रीय वित्त मंत्रालयाने फेब्रुवारीत केवळ २८ दिवस असल्याने जीएसटी संकलनात घट आल्याचा खुलासा केला आहे.
वार्षिक सरासरीचा विचार केल्यास २०२२ च्या फेब्रुवारीतील जीएसटी संकलनाच्या तुलनेत या फेब्रुवारीतील संकलन १२ टक्क्यांनी वाढले असल्याचा दावा केंद्रीय अर्थ मंत्रालयातर्फे करण्यात आला आहे. बुधवारी केंद्रीय अर्थ मंत्रालयाने यासंदर्भातील आकडेवारी प्रसिद्ध केली आहे. या महिन्यात उपकाराच्या माध्यमातून ११ हजार ९३१ कोटी रुपये जमा हाले आहेत. जीएसटी लागू झाल्यापासूनचा हा सर्वोच्च आकडा आहे, असे म्हटले आहे. अर्थात जानेवारीच्या तुलनेत फेब्रुवारी महिन्यातील करसंकलनात घट झाल्याचे अर्थमंत्रालयाने मान्य केले आहे. २०२३ च्या जानेवारीत सरकारकडे १.५७ लाख कोटी रुपये जीएसटीच्या माध्यमातून जमा झाले आहेत. जानेवारीची आकडेवारी आजवरील दुसऱ्या क्रमांकांची सरअधिक मोठी आकडेवारी ठरली आहे.
२०२३ च्या फेब्रुवारीत जीएसटीच्या माध्यमातून केंद्र सरकारकडे १,४९,५७७ कोटी रूपये संकलित झाले आहेत. ज्यातील केंद्राचा वाटा २७,६६२ कोटींचा आहे तर राज्यांचा वाटा ३४,९१५ कोटींचा आहे. तसेच एकीकृत जीएसटीच्या माध्यमातून ७५०६९ कोटी रुपयांचे संकलन झाले आहे. याशिवाय ११,९३१ कोटी रुपयांच्या उपकरही जमा झाला आहे.
वृत्तसंंस्था